शिक्षण हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्यक्रम : शिवराज पाटील चाकूरकर

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30

लामजना : शिक्षणापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नाही़ त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी गुरुवारी येथे केले़

Education is the most important program: Shivraj Patil Chakurkar | शिक्षण हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्यक्रम : शिवराज पाटील चाकूरकर

शिक्षण हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्यक्रम : शिवराज पाटील चाकूरकर

मजना : शिक्षणापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नाही़ त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी गुरुवारी येथे केले़
औसा तालुक्यातील लामजना येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी सरपंच नंदलाल बिदादा होते़ प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बसवराज पाटील, आमदार ॲड़ त्रिंबक भिसे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या सभापती सुलोचना बिदादा, सपना घुगे, वेणूताई गायकवाड, पंचायत समिती सभापती कोमल सूर्यवंशी, उपसभापती दिनकर मुगळे, जि़प़सदस्य पांडुरंग चेवले, पं़स़सदस्य सिराज पटेल, मुख्याध्यापक राजकुमार पाटू, शालेय समिती अध्यक्ष लाडखाँ सय्यद, सरपंच मंगल कांबळे, शेषेराव पाटील, बालाजी कांबळे, उपसरपंच गणेश बिदादा, वैभव बालकुंदे, पंडित गावकरे, कांत महामुनी यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रतिभाताई पाटील कव्हेकर म्हणाल्या, शिक्षणाशिवाय प्रगती नाही़ सामान्यज्ञान स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढीस लागावे यासाठी जिल्हा परिषदेच्या विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले़ प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार पाटू यांनी केले़ सुत्रसंचालन गंगाधर मुळजे, प्रभाकर घोडके यांनी केले़ यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले़

Web Title: Education is the most important program: Shivraj Patil Chakurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.