Education instead of rewards? salary cut of The scientists of ISRO who are struggling for Chandrayaan 2 | बक्षिसाऐवजी शिक्षा ? 'चांद्रयान 2' साठी झटणाऱ्या इस्रोतील शास्त्रज्ञांचा पगार सरकारने कापला
बक्षिसाऐवजी शिक्षा ? 'चांद्रयान 2' साठी झटणाऱ्या इस्रोतील शास्त्रज्ञांचा पगार सरकारने कापला

ठळक मुद्देदेशाच्या अंतराळ जडणघडणमध्ये इस्रोचा सिंहाचा वाटा आहे. अग्नि क्षेपणास्त्र असेल, चांद्रयान मोहीम असेलएकीकडे इस्रोचे शास्त्रज्ञ महत्वाकांक्षी प्रकल्प 'चांद्रयान 2' च्या उड्डाणाची तयारी करत आहेत.केंद्र सरकारने इस्रोतील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संना प्रोत्साहन म्हणून 1996 पासून हा भत्ता लागू केला होता

मुंबई - एकीकडे इस्रोचे शास्त्रज्ञ महत्वाकांक्षी प्रकल्प 'चांद्रयान 2' च्या उड्डाणाची तयारी करत आहेत. या मोहिमेतून देशाचे नाव जगाच्या नकाशावर आणि अंतराळावर कोरण्याचा प्रयत्न इस्रोचे वैज्ञानिक अन् इंजिनिअर्स करत आहेत. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने इस्रोतील शास्त्रज्ञांच्या पगारात कपात केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने 12 जून 2019 रोजी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार 1996 पासून मिळणाऱ्या दोन अतिरिक्त वेतनवाढ म्हणजेच देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. 

देशाच्या अंतराळ जडणघडणमध्ये इस्रोचा सिंहाचा वाटा आहे. अग्नि क्षेपणास्त्र असेल, चांद्रयान मोहीम असेल किंवा चांद्रयान 2 च्या लाँचिंगची तयार असेल. इस्रोचे शास्त्रज्ञा दिवस-रात्र एक करुन देशाचे नाव जगात रोशन करत आहेत. देशाची अंतराळ ताकद वाढवत आहेत. मात्र, याच इस्रोमधील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कारण, सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार या शास्त्रज्ञांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येणार आहे. 1 जुलै 2019 पासून हा भत्ता बंद करण्यात आला आहे. या आदेशानंतर डी, ई, एफ आणि जी श्रेणीतील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संना हा भत्ता मिळणार नाही. इस्रोमध्ये जवळपास 16 हजार शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स आहेत. त्यामुळे या आदेशानंतर जवळपास 85 ते 90 टक्के शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संच्या पगारात दरमहा 8 ते 10 हजारांची कपात होईल. सरकारच्या या आदेशामुळे इस्रो नाराज असल्याचे बोलले जाते. 

दरम्यान, केंद्र सरकारने इस्रोतील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संना प्रोत्साहन म्हणून 1996 पासून हा भत्ता लागू केला होता. इस्रोतील कामाप्रती त्यांची तळमळ अधिक वाढावी आणि संस्था सोडून इतरत्र नोकरीसाठी जाऊ नये, हा उद्देश हा भत्ता वाढविण्यामागे होता. 


Web Title: Education instead of rewards? salary cut of The scientists of ISRO who are struggling for Chandrayaan 2
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.