३० उमेदवारांचे शिक्षण दहावीच ! रणधुमाळी : पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले ४० जण...

By Admin | Updated: October 27, 2015 00:25 IST2015-10-26T22:48:46+5:302015-10-27T00:25:32+5:30

एम.जी. मोमीन ल्ल जळकोट

Education of 30 candidates is tenth! Randhumali: 40 people who have studied till graduation ... | ३० उमेदवारांचे शिक्षण दहावीच ! रणधुमाळी : पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले ४० जण...

३० उमेदवारांचे शिक्षण दहावीच ! रणधुमाळी : पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले ४० जण...

एम.जी. मोमीन ल्ल जळकोट
जळकोट नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील ४० उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून, ३० उमेदवार दहावीपर्यंतच शिक्षण घेतले असल्याचे उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रावरून पहावयास मिळत आहे.
जळकोट नगरपंचायतीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. ७९ उमेदवार रिंगणात असले तरी त्यातील ३० जणांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.
वॉर्ड क्र. ७ मधील भाजपाचे उमेदवार शिवानंद देशमुख यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे झाले आहे. वॉर्ड क्र. ४ मधील काँग्रेसच्या डॉ. शितल काळे आणि अपक्ष गंगाधर लष्करे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. तसेच वॉर्ड क्र. २ मधील अपक्ष ज्योती धुळशे˜े यांचे, वॉर्ड क्र. ३ मधील शिवसेनेच्या कल्पना डोंगरे आणि वॉर्ड क्र. ११ मधील अपक्ष दयानंद गायकवाड हे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत.
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांमध्ये अजिम लाटवाले, हलिमाबी शेख, शशिकला संपाळे, मथुराबाई नामवाड, उस्मान मोमीन, वहिदाबी मोमीन यांचा समावेश असून हे सर्व उमेदवार भाजपाचे आहेत. तसेच सुभाष धुळशे˜े, ताहेराबी शेख, शहजादबी बागवान, भागिरथीबाई गायकवाड, श्रावण गायकवाड, दस्तगीर घोणसे, सोमनाथ धुळशे˜े, सुशिला डांगे, गंगाबाई डांगे, सूर्यकांत धूळशे˜े या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंतच झालेले आहे.
जळकोट नगरपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्यांपैकी नऊ महिला उमेदवार या सुशिक्षित नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रावरून स्पष्ट होते. या महिला उमेदवारांनी स्वाक्षरीच्या जागी अंगठा उमटविला आहे.
पार्वती बोधले (शिवसेना), ललिता गायकवाड (एमआयएम), अकबर मुल्ला (एमआयएम) या उमेदवारांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.
शाहनूरबी बागवान, चंद्रकला धुळशे˜े, शोभा गबाळे, सुमन तोगरे, ललिता गवळे, नागनाथ धुळशे˜े, प्रेमलाबाई मिसाळे, मैनोद्दीन बागवान, रिजवानबी मोमीन, पिराजी कोकणे या काँग्रेसच्या उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्याचबरोबर ललुबाई कळसे, लक्ष्मीबाई कांबळे, दत्तात्रय गायकवाड, उषाताई मोरे या अपक्ष उमेदवारांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झालेले आहे.

Web Title: Education of 30 candidates is tenth! Randhumali: 40 people who have studied till graduation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.