शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...ताेवर ईडी अटक करु शकणार नाही, सुप्रीम काेर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 08:49 IST

झारखंडमधील बेकायदेशीर खनिकर्माच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सहकारी आरोपी प्रेम प्रकाश यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले.

नवी दिल्ली : खटला चालविण्यास विलंब झाल्यास आरोपीला जामीन देण्याचे संविधानाच्या अनुच्छेद २१ अन्वये न्यायालयाला मिळालेले अधिकार हिरावून घेता येणार नाहीत. पीएमएलए कायद्याखाली अटक करण्यात आलेले आरोपी बेमुदत काळासाठी तुरुंगातच खितपत राहावेत म्हणून वारंवार पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे ईडीचे डावपेच हैराण करणारे आहेत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या पीठाने बुधवारी तीव्र नापसंती व्यक्त केली.

झारखंडमधील बेकायदेशीर खनिकर्माच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सहकारी आरोपी प्रेम प्रकाश यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले. प्रेम प्रकाश गेल्या दीड वर्षापासून कारावासात आहेत. आरोपींची सुटका केल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करतात, हा ईडीच्या वतीने युक्तिवाद करणारे सॉलिसीटर जनरल एस. व्ही. राजू यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. आरोपीने तसे केल्यास न्यायालयात दाद मागता येते. आरोपीने गुन्हा केलेला नाही किंवा जामिनावर सुटल्यानंतर तो कायद्याचे उल्लंघन करणार नाही, याची खात्री पटल्यास जामीन देता येतो, असे स्पष्ट केले. 

ईडीच्या क्लृप्त्यांवर रोषचौकशी पूर्ण करुन खटला भरण्याऐवजी आरोपी तुरुंगातच राहावे म्हणून वारंवार पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या ईडीच्या क्लृप्त्यांवर न्यायालयाने रोष व्यक्त केला. तसेच त्यांचे हे डावपेच हैराण करणारे आहेत, अशी टिप्पणी न्या. संजीव खन्ना यांनी केली.

निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल करावेचौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपीला अटक करू नये, असा डिफॉल्ट जामिनाचा अर्थ आहे. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय खटला चालवता येणार नाही, असे म्हणता येणार नाही. काही प्रकरणांमध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करून त्याची  ईडीला कल्पना देऊ. पीएमएलए कायद्यानुसार चौकशी पूर्ण न झाल्यास तुरुंगात असलेला आरोपी जामिनास पात्र ठरतो. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहितेने निर्धारित केलेल्या ६० किंवा ९० दिवसांच्या कालावधीत अंतिम आरोपपत्र दाखल करावे, असे न्यायालयाने म्हटले.

अनेक नेते जामिनावर सुटणार? सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणांमुळे सध्या खटल्याशिवाय तुरुंगवास भोगत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच राज्यसभेतील भाजपचे नेते संजय सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची जामिनावर सुटका करण्याची शक्यता बळावणार आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय