शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

ईडी आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार, अतिरिक्त सुरक्षा दल तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 08:57 IST

जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.

Hemant Soren ( Marathi News) रांची : कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज रांची येथे ईडी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार आहे. ईडीला लिहिलेल्या पत्रात हेमंत सोरेन यांनी आज दुपारी 1 वाजता चौकशीसाठी हजर राहीन, असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्याची मागणी केंद्राकडे आधीच केली होती. दरम्यान, जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये 2011 च्या बॅचचे IAS अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.

सोमवारी ईडीचे पथक दिल्लीत दिवसभर त्यांचा शोध घेत होते, मात्र हेमंत सोरेनचा यांचा शोध लागला नाही. यानंतर मंगळवारी हेमंत सोरेन हे अतिशय नाट्यमय पद्धतीने रांचीला पोहोचले आणि तिथे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या (झामुमो)  आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या. 

ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) काही आमदार रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये थांबले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कल्पना सोरेन यांच्या नावाची राजकीय वर्तुळात वेगाने चर्चा होत आहे. 

दरम्यान, हेमंत सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. दुसरीकडे, भाजपने सीएम सोरेन यांना बेपत्ता मुख्यमंत्री म्हणून संबोधले असून झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली आहे. तसेच, हेमंत सोरेन यांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे भाजप नेते निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.

हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्तदरम्यान, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत.सोमवारी ईडीने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे आणि हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती. 

टॅग्स :JharkhandझारखंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय