ललित मोदींना ईडीने बजावले समन्स

By Admin | Updated: July 7, 2015 15:01 IST2015-07-07T10:00:22+5:302015-07-07T15:01:19+5:30

आयपीएल घोटाळ्यामुळे चर्चेत असलेले ललित मोदी यांना पैशाच्या अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.

ED summons Lalit Modi | ललित मोदींना ईडीने बजावले समन्स

ललित मोदींना ईडीने बजावले समन्स

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - आयपीएल घोटाळ्यामुळे चर्चेत असलेले ललित मोदी यांना पैशाच्या अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी त्यांच्या मुंबईस्थित मेहमूद अब्दी संस्थेमार्फत समन्स बजावण्यात आले असून तीन आठवड्यात आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात उत्तर देण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ललित मोदींविरोधातील १७ प्रकरणांचा ईडी तपास करत आहे. 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्याविरुद्ध अवमानजनक ट्विट केल्याबद्दल राष्ट्रपती भवनेन रविवारी ललित मोदी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 
ललित मोदी प्रकरणात भाजपा नेत्या सुषमा स्वराज, वसुंधरा राजे अडकल्यामुळे भाजपा चांगलाच अडचणीत सापडला होता. मोदींवर काहीच कारवाई होत नस्लायने भाजपावर चहुबाजूंनी टीकाही होत होती, अखेर आता ईडीने मोदींना समन्स बजावले आहे. 

 

Web Title: ED summons Lalit Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.