शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Sonia Gandhi : सोनिया गांधींना ईडीने बजावले नव्याने समन्स; आता 'या' तारखेला हजर राहण्यास सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:57 IST

National Herald Case : याआधीही सोनिया गांधींना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मुदत मागितली होती.

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात पुन्हा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी 21 जुलै रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. याआधीही सोनिया गांधींना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मुदत मागितली होती.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींचे पुत्र आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली होती. असोसिएट जर्नल लिमिटेडचा (AJL) ताबा घेण्यासाठी सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन केली आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून या कंपनीसाठी कर्ज घेण्यात आले, असा आरोप आहे.

याचबरोबर, काँग्रेसने असोसिएट जनरल लिमिटेडला 90 कोटी रुपयांचे कथित कर्ज दिल्याचा आरोप आहे. हे कर्ज काँग्रेसने यंग इंडियनला दिले आणि याच आधारावर असोसिएट जर्नल लिमिटेडचे ​​बहुतांश शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे गेले होते. 90 कोटींच्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनने काँग्रेसला केवळ 50 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास सुरू आहे.

राहुल गांधींची सुद्धा चौकशीगेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची चार दिवस चौकशी केली होती. यावेळी प्रियांका गांधीही राहुल यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात गेल्या होत्या. ईडीकडून राहुल गांधी यांची सलग होत असलेल्या चौकशीला काँग्रेसने विरोध दर्शवला होता. राहुल गांधी यांना अशा प्रकारे त्रास देता येणार नाही, असे त्यावेळी काँग्रेसने म्हटले आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय