शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

कर्ज घोटाळ्यात ईडीच्या धाडी; ४८१ कोटींच्या मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 03:42 IST

मनी लाँड्रिंग प्रकरण : बासमती तांदूळ प्रक्रिया कंपनीविरोधात कारवाई

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी बासमती तांदूळ प्रक्रिया उद्योगातील आघाडीची कंपनी आरईआय अ‍ॅग्रो लिमिटेडच्या तळांवर छापे मारले. या छाप्यांत कंपनीच्या ४८१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.

ईडीने कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये हंगामी जप्ती आदेश काढला होता. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. २०१६ मध्ये ईडीने कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. आरईआय अ‍ॅग्रो लि. ही जगातील सर्वांत मोठी बासमती तांदूळ प्रक्रिया कंपनी आहे. कंपनीविरुद्ध ३,८७१.७१ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळ्याचा आरोप आहे. याचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. ईडीच्या निवेदनातील माहितीनुसार, कंपनीच्या ४८१.०४ कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांत जमिनी, इमारती, प्रक्रिया प्रकल्प व यंत्रे यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीची कार्यालये आणि कंपनीच्या मालकीची काही पवन ऊर्जा क्षेत्रेही जप्त करण्यात आली आहेत. कोलकतास्थित फॉर्च्युन समूहाच्या चार कंपन्यांची ५० टक्के भागीदारी असलेल्या काही मालमत्ताही या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आल्या आहेत.

कंपनीचे संचालक संदीप झुनझुनवाला, संजय झुनझुनवाला आणि इतरांना विविध बँकांकडून क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. युको बँकेच्या कॉर्पोरेट शाखेचा त्यात समावेश होता. या सुविधेचा वापर करून बँकांना २०१३ पासून फसविण्यात येत होते. यामुळे बँकांना तब्बल ३,८७१.७१ कोटी रुपयांचा फटका बसला. ज्या कारणांसाठी कर्ज घेण्यात आले, त्यासाठी हा पैसा संचालक वापरतच नव्हते. हा पैसा अन्यत्र वळविण्यात येत होता. युको बँकेच्या नेतृत्वाखालील १४ बँकांना फसविल्याप्रकरणी संदीप झुनझुनवाला यांना अटकही करण्यात आली होती.अशी केली बँकांची फसवणूकबँकांना फसविण्यासाठी कंपनीने बनावट बिले सादर करणे, थेट अथवा ताब्यातील कंपन्यांच्या माध्यमातून वरसना इस्पातमध्ये गुंतवणूक करणे, विविध शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या रकमा आगाऊ उचलणे, खोटी खरेदी बिले दाखवून बांधकामांची जास्तीची किंमत दाखवणे, अशा पद्धतींचा वापर कंपनी करीत होती.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbankबँक