शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 11:41 IST

Illegal mining case : आतापर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पंजाब : बेकायदेशीर खाणकाम आणि भोला ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यादरम्यान ईडीने आतापर्यंत तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश सिंग उर्फ ​​भोला ड्रग्स प्रकरणात ईडीने जप्त केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर खाणकाम केले जात असल्याचे चौकशीत आढळले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

नसीब चंद आणि श्री राम क्रशर यांचा अवैध खाण प्रकरणात सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान आतापर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, हे ड्रग्ज मनी लाँड्रिंग प्रकरण कोट्यावधी रुपयांच्या सिंथेटिक अंमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंधित आहे, जे २०१३-१४ दरम्यान पंजाबमध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी ईडीने पंजाब पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केला होता, जो सामान्यतः भोला ड्रग्ज केस म्हणून ओळखला जातो.

कुस्तीपटू ते पोलीस बनलेला ड्रग्ज माफिया जगदीश सिंग उर्फ ​​भोला हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. भोलाला ईडीने जानेवारी २०१४ मध्ये अटक केली होती. सध्या पंजाबच्या पीएमएलए न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, जगदीश भोलाला भारतीय कुस्तीचा 'किंगकाँग' म्हटले जात होते आणि त्याला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. १९९१ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भोलाने रौप्य पदक जिंकले होते.

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या रुस्तम-ए-हिंद या पंजाबी भाषेतील चित्रपटातही भोलाने भूमिका साकारली होती. निलंबित होण्यापूर्वी भोलाने काही काळ पंजाब पोलिसात डीएसपी म्हणून काम केले होते. मुंबई पोलिसांनी जगदीश सिंग उर्फ ​​भोला याला २००८ मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर सरकारने त्याच्याकडून अर्जुन पुरस्कार काढून घेतला आणि पंजाब पोलिसांनी त्यांना डीएसपी पदावरून निलंबित केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय