शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 05:42 IST

दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवणारे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी कपिल राज यांनी सुमारे १६ वर्षांच्या सेवेनंतर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयात (ईडी) असताना दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवणारे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी कपिल राज यांनी सुमारे १६ वर्षांच्या सेवेनंतर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.

४५ वर्षीय राज हे २००९च्या बॅचचे अधिकारी आहेत. सूत्रांनी सांगितले की, त्यांनी ‘वैयक्तिक कारणांमुळे’ राजीनामा दिला आहे. निवृत्तीचे वय ६० वर्षे असल्याने त्यांची अजूनही सुमारे १५ वर्षे सेवा शिल्लक होती. राज यांनी ईडीमध्ये जवळजवळ आठ वर्षे सेवा केली

कारवाईवर बारीक लक्षईडीमध्ये असताना, त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये रांची येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवले होते. काही महिन्यांनंतर, मार्च २०२४ मध्ये, दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी ईडीच्या झडतीनंतर राज हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

नीरव मोदी, मेहुल चोक्सी अन् इतरांची केली चौकशी ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज राजकीय अटकांसाठी चौकशी प्रश्नावली तयार करत आणि अंतिम रूप देत असत. तपासावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या टीमचे मनोबल वाढवण्यासाठी ते अनेकदा शोधमोहिमांमध्ये घटनास्थळी पोहोचत असत.

मुंबईत ईडीचे उपसंचालक म्हणून काम करताना त्यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, डीएचएफएल आणि इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणांची चौकशी देखील केली होते. राज हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल