शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबईसह २५ ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 06:37 IST

माल्टा, सायप्रस अशा लहानशा देशांत या कंपन्यांनी आपल्या कंपनीची नोंदणी केली. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी भारतातील अनेक शहरांतून विविध बँकांत शेकडो बँक खाती सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परदेशात नोंदणी असलेल्या, मात्र भारतातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना ईडीने दणका दिला असून या कंपन्यांनी भारतातील ग्राहकांकडून घेतलेले तब्बल ४ हजार कोटी रुपये अवैधरीत्या परदेशात पाठविल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. या प्रकरणी ईडीने मुंबईसह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील २५ ठिकाणी छापेमारी केली आहे.

माल्टा, सायप्रस अशा लहानशा देशांत या कंपन्यांनी आपल्या कंपनीची नोंदणी केली. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी भारतातील अनेक शहरांतून विविध बँकांत शेकडो बँक खाती सुरू केली. या कामाकरिता आशिष कक्कर, नीरज बेदी, अर्जुन अश्विनभाई अधिकारी, अभिजित खोत या हवाला ऑपरेटर्सची मदत घेतली होती. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड व मोबाइल क्रमांकाचा वापर करत ही बँक खाती सुरू केली. तसेच हे लोक पाबेलो, जॉन, वॉस्टन अशा बनावट नावाने व्यवहार करत होते. या कंपन्यांच्या वेबसाइटवरून ऑनलाइन गेमिंगची सुविधा देण्यात येत होती, त्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले होते. हे पैसे भरल्यानंतरच ग्राहकांना ऑनलाइन गेम खेळता येत होते. तसेच ज्या लॅपटॉपवरून परदेशात पैसे पाठवले गेले ते लॅपटॉप तसेच १९ लाख रुपयांची रोख रक्कम आणि २६९५ अमेरिकी डॉलरदेखील ईडीने जप्त केले आहेत. याखेरीज कंपनीची ५५ बँक खातीदेखील गोठवण्यात आली आहेत.

फेमा कायद्याचा भंगnभारतातील ग्राहकांकडून या कंपन्यांनी तब्बल ४ हजार कोटी रुपये गोळा केल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात दिसून आले. nग्राहकांकडून गोळा केलेले पैसे परदेशात पाठविण्यासाठी परदेशी चलन विनिमय कायद्यामध्ये (फेमा) ज्या तरतुदी आहेत त्याचा भंग करत हे पैसे त्यांनी पाठविल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. nहे पैसे परदेशात पाठविण्यासाठी काही बनावट कंपन्यांची स्थापना करण्यात आली. या कंपन्या आयात-निर्यातीचे काम करत असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय