शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईडीला लाखाचा दंड, नागरिकांचा छळ थांबवा, हायकोर्टाने सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 08:44 IST

Mumbai High Court News:  ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणे थांबवा, असे खडे बोल सुनावत  उच्च न्यायालयाने ईडीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

मुंबई - ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणे थांबवा, असे खडे बोल सुनावत  उच्च न्यायालयाने ईडीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

नागरिकांची छळवणूक होणार नाही, यासाठी कायद्याचा अंमल करणाऱ्या तपास यंत्रणांना कठोर संदेश देण्याची वेळ आली आहे, असे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने म्हटले. ‘मला दंड ठोठावण्यास भाग पाडले आहे. तपास यंत्रणांना एक कठोर संदेश जाणे आवश्यक आहे. तुम्ही कायदा हातात घेऊन नागरिकांना त्रास देऊ शकत नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

मनी लाँड्रिंगचे कट गुप्तपणे रचले जातात आणि अंधारात त्यांची अंलबजावणी होते. माझ्यासमोर सध्या असलेले प्रकरण हे पीएमएलएच्या नावाखाली दडपशाहीचे उत्तम उदाहरण आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. ईडीने दाखल केलेल्या अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयाने ८ ऑगस्ट २०१४ रोजी एका विकासकाविरुद्ध जारी केलेली ‘प्रक्रिया’ रद्द करण्याचे आदेश देताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले.

प्रकरण काय?- हे प्रकरण खरेदीदार आणि विकासकामधील कराराच्या उल्लंघनाचे आहे. मालाडमधील एका इमारतीच्या दोन मजल्यांच्या नूतनीकरणासाठी विकासकाला चार कोटी देण्याचे खरेदीदाराने मान्य केले. - नव्या इमारतीच्या सोसायटीचा अध्यक्ष असलेल्या खरेदीदाराने इमारतीतील दोन माळे खरेदी करून तेथे गेस्ट हाऊस सुरू केले. दोघांत करार झाला. त्यानुसार, विकासक २००७ मध्ये खरेदीदाराला गेस्ट हाऊसचा ताबा देणार होता. - मात्र, विलंब झाल्याने खरेदीदाराने पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दखल न घेतल्याने दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पुढे ही तक्रार ईडीकडे पाठविली गेली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय