शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"विरोधकांना सतावण्यासाठी होतोय ईडी व सीबीआय यंत्रणेचा गैरवापर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 06:41 IST

शरद पवार यांचा मोदी सरकारवर घणाघाती आरोप

नवी दिल्ली : विरोधकांना चूप करण्यासाठी मोदी सरकार ईडी व सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत आहे. या आव्हानांचा सामना धैर्याने करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, आदी उपस्थित होते. या अधिवेशनाला देशभरातून सात हजारांवर कार्यकर्ते आले होते.

मोदी सरकारच्या काळात कृषी उत्पादनात व एकूण प्रगतीमध्ये घट झाल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, यूपीएच्या काळात १५० टक्क्यांनी विकास झाला होता. हा दर सध्या केवळ ४४ टक्क्यांवर आला आहे. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या सक्षमीकरणाचे भाषण करतात व त्यांच्याच राज्यात बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांवर दया दाखवितात, हा कोणता न्याय आहे, असा सवाल त्यांनी केला.चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप करून ते म्हणाले, चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अजितदादांचे भाषण हुकले विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे दोन्ही दिवस भाषण होऊ शकले नाही. तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलतील, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. अधिवेशनाच्या अखेरीस खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना भाषणासाठी पाचारण केले खरे, परंतु त्यावेळी अजितदादा व्यासपीठावर उपस्थित नव्हते. यामुळे अजितदादांचे भाषण होऊ शकले नाही.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार