शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्थिक आरक्षणाने जातीय तेढ कमी होईल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 07:31 IST

मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात आठवले म्हणाले, एससी आणि मराठा या जातींमध्ये वाद वाढण्यास आरक्षण हेही कारण होते.

मुंबई : केंद्र सरकारने आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे जातीय आरक्षणामुळे अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि सवर्ण वर्गात होणारा संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. समाजात एक प्रकारे ऐक्य निर्माण करणारा हा निर्णय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी केले.

मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात आठवले म्हणाले, एससी आणि मराठा या जातींमध्ये वाद वाढण्यास आरक्षण हेही कारणहोते. आरक्षण मिळते म्हणून सरकारी जावई असे हिणवले जायचे. अत्याचार व्हायचे. त्यामुळे या दोन समाजांत ऐक्य व्हावे, या उद्देशाने मी सवर्ण समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भूमिका मांडली. सर्वच सवर्ण श्रीमंत नसतात या विचारातून मराठा समाजातील गरिबांना आरक्षणाची मागणी केली. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणीकेली होती. घटनादुरुस्ती करत केंद्र सरकारने हे आरक्षण दिले. या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारे संविधानविरोधी कृती घडली नाही. गरिबांच्या आरक्षणाला विरोध करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विरोध करण्यासारखे असल्याचा आरोपही आठवले यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेना यांची युती अंतिम टप्प्यात होईल. युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात. युतीच्या राजकारणात आरपीआयला कमी जागा सोडल्या जातात. त्यामुळे इच्छा असूनहीअन्य समाज घटकांना उमेदवारी देता येत नाही. मात्र यापुढील काळात भटक्या विमुक्त, इतर मागास वर्गीय समाजाच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहील, असे रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेreservationआरक्षण