पृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वाला ग्रहण
By Admin | Updated: October 17, 2014 02:56 IST2014-10-17T02:56:29+5:302014-10-17T02:56:29+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस नेतृत्व नाराज असल्याचे संकेत आहेत़
पृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वाला ग्रहण
काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे वारे : महाराष्ट्र केंद्रस्थानी
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस नेतृत्व नाराज असल्याचे संकेत आहेत़ राज्यातील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी चव्हाण यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना आरोपींच्या पिंज:यात उभे केल़े हे पक्षावर उलटल्याचे पक्षश्रेष्ठीचे मत आह़े त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला कौल मिळाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी नवा चेहरा येणो निश्चित मानले जात आह़े निकाल येणो अद्याप बाकी असले आणि निकाल काहीही लागला तरी पक्षश्रेष्ठी या मतावर ठाम राहतील, असा सूत्रंचा दावा आहे.
काँग्रेसमध्ये संघटनेत फेरबदलाचे वारे वाहू लागले असून पक्षनेतृत्वाने या दिशेने चिंतन सुरू केले आह़े उच्चपदस्थ सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बिहारच्या जिल्हाध्यक्षांसोबत बुधवारी चर्चा केली़ यानंतर वरिष्ठ पक्षनेत्यांशी चर्चा करून फेरबदलाच्या दिशेने प्राथमिक तयारी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिल़े तत्पूर्वी पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सोनियांना पक्ष सदस्यत्व मोहिमेच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली़
बिहार काँग्रेसचे बहुतांश जिल्हाध्यक्ष प्रभारी सरचिटणीस सीपी जोशी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांना हटविण्याची मागणी घेऊन दिल्लीत पोहोचले होत़े आपल्या मागणीसाठी काँग्रेस मुख्यालयापुढे धरणो देण्याची त्यांची योजना होती़ मात्र द्विवेदी यांनी महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुका बघता त्यांना यापासून परावृत्त केल़े शिवाय सोनिया गांधी यांच्यासमक्ष आपले गा:हाणो मांडण्याची संधी देण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आल़े त्यानुसार बिहारच्या नेत्यांनी सोनियांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपवल़े या निवेदनात अशोक चौधरी यांना तात्काळ हटविण्याची मागणी केली आह़े यावेळी सोनियांनी यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची ग्वाही दिली़
पक्षसूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ बिहारच नाही तर महाराष्ट्र आणि अन्य राज्ये तसेच राष्ट्रीय स्तरावरही फेरबदलाची तयारी काँग्रेसमध्ये सुरू झाली आह़े विशेष म्हणजे, राहुल समर्थकांना पक्षाची धुरा सोपविण्याच्या चर्चेलाही सोनियांनी विराम दिला आह़ेज्येष्ठ नेत्यांना डावलून युवा नेत्यांना पुढे आणण्याच्या प्रयत्नात काँग्रेसच्या वाटय़ाला केवळ निराशा आली आह़े त्यामुळे पक्षनेतृत्वाने यादिशेनेही मोठय़ा फेरबदलाचे संकेत दिले आहेत़
अनवधानाने बोललो, दिलगिरीही व्यक्त
पुणो - ‘टेलिग्राफ’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांच्याबाबत आपण अनवधानाने बोलून गेल्याचा खुलासा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केला. आपण त्यावर दिलगिरी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाखत संपल्यावर विश्लेषणात्मक गप्पा मारतानाचे छुपे रेकॉर्डिग केल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. कराडहून मुंबईला जाताना पुण्यात थांबल्यावर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले,‘टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आदर्श घोटाळ्याबाबत आपण बोललो नव्हतो. परंतु मुलाखत संपल्यानंतर झालेल्या विश्लेषणात्मक अनौपचारिक गप्पाही त्यांनी कॅमे:यामध्ये छुप्या
पद्धतीने रेकॉर्ड केल्या. हे कितपत योग्य आहे?’