CoronaVirus: आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:02 PM2021-04-30T18:02:36+5:302021-04-30T18:04:57+5:30

CoronaVirus: निवडणूक आयोगानेच मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आमची प्रतिमा डागाळत असल्याचे म्हटले आहे.

ec moves madras hc to stop media reporting on court oral observations | CoronaVirus: आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

CoronaVirus: आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात धावप्रतिमा डागाळत असल्याचा दावामीडियाने तोंडी निरीक्षणे आणि टिप्पण्यांवर आधारित वृत्त देऊ नये - आयोग

मद्रास: एकीकडे कोरोनाचा कहर देशभरात कायम असताना दुसरीकडे निवडणुकांचे रणही तापताना दिसत आहे. देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमधील प्रचारामुळे कोरोना उद्रेक झाला असा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात एका याचिकेवरील सुनावणीवेळी मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघडणी केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने अनेकविध आदेश जारी केले. यानंतर आता निवडणूक आयोगानेच मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आमची प्रतिमा डागाळत असल्याचे म्हटले आहे. (ec moves madras hc to stop media reporting on court oral observations)

पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान कोरोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन होत असताना राजकीय पक्षांना रोखले नाही, यावर मद्रास उच्च न्यायालयाने मोठी नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, या शब्दांत न्यायालयाने फटकारले होते. यानंतर आता आमची प्रतिमा डागाळली, असे सांगत निवडणूक आयोगाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी डॉक्टरांना सल्ला देताय? १० लाखांचा दंड ठोठावू; CJI संतापले 

तोंडी निरीक्षणे आणि टिप्पण्या नोंदवू नयेत

प्रसारमाध्यांनी सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या तोंडी निरीक्षणे आणि टिप्पण्या नोंदवू नयेत आणि केवळ निकालात नोंदवलेल्या निरीक्षणाचा अहवाल द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाने आपल्या याचिकेत केली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमुळे निवडणुका पार पडण्याची घटनात्मक जबाबदारी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून निवडणूक आयोगाची प्रतिमा डागाळली आहे, असेही आयोगाने याचिकेत म्हटले आहे. येत्या २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान करोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिका दाखल केली होती.

“आतातरी काहीतरी करा”; १०० प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे पंतप्रधान मोदींना पत्र

दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आता मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे.
 

Web Title: ec moves madras hc to stop media reporting on court oral observations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.