शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक; राजीव सातवांच्या रिक्त जागी कुणाला संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 13:56 IST

महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे.

नवी दिल्ली: राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान होईत तसेच त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल. महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. (election commission of india to hold rajya sabha by polls for six seats on 4 october including maharashtra)

“मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रिक्त राज्यसभेच्या जागांवर ४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, मध्य प्रदेशातील थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय; ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

राजीव सातवांच्या रिक्त जागी कुणाला संधी?

काँग्रेस राजीव सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कुणाला पाठवणार, काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची मागच्या वेळी हुकलेली संधी परत मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना नुकतेच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमले आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील राज्यसभेची जागा एआयडीएमकेचे नेते केपी मुनुसामी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. याशिवाय, तामिळनाडूमधूनच आर. वैथिलिंगम यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे, ज्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता. ६ मे २०२१ रोजी मानस रंजन भुनिया यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक जागा रिक्त झाली आहे. याशिवाय बिसजित डमरे यांच्या राजीनाम्यानंतर आसाममध्ये एक जागा रिक्त झाली आहे. सोबतच बिहार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकाही घोषित झाल्या आहेत. या निवडणुका देखील ४ ऑक्टोबरला पार पडतील. तसेच पुदुच्चेरी राज्यसभेच्या एका जागेसाठी याच दिवशी पोटनिवडणूक होणार आहे.   

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा