इबोला हा सर्वात भयंकर रोग

By Admin | Updated: October 14, 2014 01:55 IST2014-10-14T01:55:58+5:302014-10-14T01:55:58+5:30

इबोला रोगाचा प्रादुर्भाव ही आजच्या आधुनिक जगातील सर्वात वाईट बाब असून, लोकांना जर योग्यरीत्या मार्गदर्शन करता आले,

Ebola is the most severe disease | इबोला हा सर्वात भयंकर रोग

इबोला हा सर्वात भयंकर रोग

मोठे संकट : जागतिक आरोग्य संस्था ‘हू’ चे वक्तव्य
मनिला (फिलिपाइन्स ) : इबोला रोगाचा प्रादुर्भाव ही आजच्या आधुनिक जगातील सर्वात वाईट बाब असून, लोकांना जर योग्यरीत्या मार्गदर्शन करता आले, तर या रोगाचा संसर्ग व त्यामुळे येणारे वित्तीय संकट टाळता येईल असे जागतिक आरोग्य संघटना हू ने म्हटले आहे. 
हूच्या सरसंचालक मार्गारेट चॅन यांनी जागतिक बँकेच्या आकडेवारीचा दाखला दिला असून, इबोलाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक करत असलेल्या धडपडीमुळे हा रोग अधिक पसरत आहे असे म्हटले आहे. कोणत्याही रोगाची भीती प्रत्यक्ष रोगापेक्षा जास्त गतीने पसरते हे हू च्या कर्मचा:यांना माहीत आहे असे चॅन यांनी सांगितले. चॅन यांचे हे निवेदन प्रादेशिक आरोग्य अधिवेशनात वाचून दाखविण्यात आले. इबोलाच्या जिवाणूमुळे अर्थव्यवस्था कोसळत आहेत, आतार्पयत या रोगाने 4 हजार लोकांचा बळी घेतलेला असून, यातील बहुतांश लोक पश्चिम आफ्रिकन देश लायबेरिया, सिएरा लोने व गिनिया येथील आहेत.  (वृत्तसंस्था)
 
4ह्युस्टन : अमेरिकेत महिला आरोग्य कर्मचा:यास इबोलाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. इबोलामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णावर उपचार करणा:या वैद्यकीय पथकामध्ये या महिलेचा समावेश होता. 
 
4उपचार प्रक्रियेदरम्यानच्या सुरक्षात्मक उपायांतील कोणत्या त्रुटीमुळे आरोग्य कर्मचारी महिलेला बाधा झाली याचा शोध घेण्यात येत आहे. संसर्ग झालेली महिला थॉमस एरिक डंकन याच्यावर उपचार करणा:या पथकात सामील होती. डंकनचा टेक्सासमधील एका रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला होता. 
 
4सरकारी तपासणीत रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) या महिलेला इबोलाची बाधा झाल्याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेत अशा प्रकारे इबोलाचा संसर्ग होण्याची ही पहिली घटना आहे. सीडीसीचे प्रमुख थॉमस फ्राइडेन म्हणाले की, संपूर्ण सुरक्षात्मक कवच असतानाही या महिलेला संसर्ग कसा झाला याचा तपास करण्यात येणार आहे.

 

Web Title: Ebola is the most severe disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.