ईस्टर्न....लाचखोर पोलीस हवालदारावर कारवाई
By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:36+5:302014-08-28T20:55:36+5:30
लाचखोर पोलीस हवालदारावर कारवाई

ईस्टर्न....लाचखोर पोलीस हवालदारावर कारवाई
ल चखोर पोलीस हवालदारावर कारवाईपोलीस आयुक्तांनी केले निलंबनमुलुंड: येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक फुलसिंग पवार यांचे कार्यालयीन मदतनीस (ऑर्डरली) पोलीस शिपाई उमेश जोशीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी १३ ऑगस्टला अटक केली होती. आता या लाचखोर पोलीस शिपायाला निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. सणासुदीच्या तसेच निवडणुकीच्या काळात पोलीस प्रतिबंधात्मक कारवाईसाठी काही आरोपींना नोटिस धाडून कारवाई करतात. या रोजच्या जाचातून सुटका होण्यासाठी या प्रकरणातील फिर्यरदी दरमहा ४ हजार जोशीला देत होता. मात्र, असे असूनही काही दिवसांपूर्वी मुलुंड पोलिसांनी फिर्यरदीला नोटीस धाडली. पैसे देऊनही नोटीस कशी आली, हे जाणून घेण्यासाठी फिर्यरदीने जोशीला ४ हजार घेऊन पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. अखेर याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी एसीबीने सापळा रचून जोशीसह एका अंंशकालीन पत्रकाराला अटक केली होती. यामध्ये जोशीकडे चौकशी सुरु असून जोशीला निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी मुलुंड पोलिस ठाण्याला दिले आहे. (प्रतिनिधी)