भूकंपाने मलेशियात ११ गिर्यारोहक ठार

By Admin | Updated: June 7, 2015 01:20 IST2015-06-07T01:20:35+5:302015-06-07T01:20:35+5:30

मलेशियात शक्तिशाली भूकंपामुळे माऊंट किनाबलूवर ११ गिर्यारोहक ठार झाले असून आठ बेपत्ता आहेत. माऊंट किनाबलू हा आग्नेय आशियातील सर्वांत उंच पर्वत आहे.

Earthquake killed 11 climbers in Malaysia | भूकंपाने मलेशियात ११ गिर्यारोहक ठार

भूकंपाने मलेशियात ११ गिर्यारोहक ठार

कुंदासांग (मलेशिया) : मलेशियात शक्तिशाली भूकंपामुळे माऊंट किनाबलूवर ११ गिर्यारोहक ठार झाले असून आठ बेपत्ता आहेत. माऊंट किनाबलू हा आग्नेय आशियातील सर्वांत उंच पर्वत आहे. या भूकंपाने किनाबलू पर्वताला हादरून सोडले होते.
११ मृतदेह हुडकून काढण्यात यश आले असून, आठ जण अद्यापही बेपत्ता आहेत, असे टिष्ट्वट बोरेनो बेटावरील सबाह राज्याच्या पर्यटनमंत्री मसिदी मंजून यांनी केले आहे. या पर्वताजवळ शुक्रवारी ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. तीव्र भूकंपामुळे किनाबलू पर्वताच्या ४,०९५ मीटर उंच शिखरावरून ग्रेनाईटच्या मोठमोठ्या शिळा कोसळल्या. भूकंपामुळे १३७ गिर्यारोहक अनेक तास पर्वतावर अडकून पडले होते. मात्र, त्यांची सुखरूप सुटका झाली आहे. मृतांत सिंगापूरची एक मुलगी आणि एका स्थानिक गाईडचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.
मोठमोठे खडक कोसळताहेत
तत्पूर्वी पर्वतावर अडकलेल्या एका गिर्यारोहकाने फेसबुकवर म्हटले होते, ‘आम्ही हेलिकॉप्टरची प्रतीक्षा करीत आहोत. हेलिकॉप्टरच आता आम्हाला वाचवू शकते. मोठ्या प्रमाणात अवाढव्य खडक कोसळत असून, खाली जाण्याचा कोणताही सुरक्षित मार्ग नाही व अजूनही धक्के बसत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Earthquake killed 11 climbers in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.