शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आधी होते १०० कोटी उपाशी, आता झालेत २०० कोटी काैशल्यवान हात- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 06:24 IST

‘सबका साथ सबका विकास’ जगकल्याणाचे माॅडेल

नवी दिल्ली :  बऱ्याच कालावधीपासून भारत हा १०० कोटी उपाशी पाेट असलेल्या लाेकांचा देश आहे, असे समजले जात हाेते. मात्र, आता ही धारणा बदलली असून, आता १०० कोटींपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी बुद्धिवंत लाेक, २०० कोटींपेक्षा अधिक काैशल्यवान हात आणि काेट्यवधी तरुणांचा देश म्हणून आता भारताकडे बघितले जात आहे. वर्ष २०४७ पर्यंतचा काळ आपल्या सर्वांसाठी फार माेठी संधी घेऊन आला आहे. पुढील १ हजार वर्षांपर्यंत स्मरणात राहील, असा विकासाचा पाया रचण्याची संधी या काळात राहणाऱ्या भारतीयांकडे आहे. २०४७ पर्यंत आपला देश विकसित देशांमध्ये सामील हाेईल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्यक्त केला आहे.

भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० शिखर परिषदेचे नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर राेजी आयाेजन हाेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान माेदी यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या  मुलाखतीमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप, भारताचा आर्थिक विकास, जागतिक पातळीवर देशाचे वाढते महत्त्व, सायबर सुरक्षा, कर्जाचा विळखा, जैवइंधनाचे धाेरण इत्यादींबाबत ठाम भूमिका मांडली. आपल्या कल्पनेतला २०४७ मधील भारत कसा असेल, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. मोदी म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगात नवी रचना अस्तित्वात आली. त्याचप्रमाणे काेराेना महामारीनंतर जगात नवी व्यवस्था आकार घेत आहे. जगाचा जीडीपीकेंद्रित दृष्टिकाेन आता मानवकेंद्रित हाेत आहे. त्यात भारत एका मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. 

माेदी म्हणाले...जगाप्रति आमचे शब्द आणि दृष्टिकाेन केवळ विचारांच्याच स्वरूपामध्ये नव्हे, तर भविष्यातील राेडमॅपच्या रूपानेही स्वीकारले जात आहेत.जीडीपी कितीही असाे, प्रत्येकाचा आवाज महत्त्वाचा आहे. भारताच्या जी-२० अध्यक्षतेमुळे अनेक सकारात्मक परिणाम समाेर येत आहेत.

रेवडी संस्कृतीवर पंतप्रधान म्हणाले...विकसनशील देशांसाठी जागतिक कर्जाचे संकट चिंतेचा विषय आहे. अनेक राज्यांनी माेफतच्या सुविधा, वस्तू वाटण्याचे धाेरण स्वीकारले. याचे क्षणिक राजकीय लाभ मिळतील. मात्र, दीर्घ कालावधीचा विचार केल्यास याचे फार माेठे सामाजिक आणि आर्थिक मूल्य माेजावे लागू शकते. बेजबाबदार आर्थिक धाेरणे आणि लाेकप्रियतावादाचा सर्वाधिक परिणाम सर्वांत गरीब वर्गावर हाेताे.

‘भारत आता केवळ बाजारपेठ नव्हे’

आर्थिक आव्हानांशिवाय मानवतेला प्रभावित करणारी इतर अनेक महत्त्वपूर्ण आणि तात्कालिक आव्हानेदेखील आहेत, याची जाणीव काेराेना महामारीने जगाला करून दिली. भारताने आर्थिक विकास, तंत्रज्ञानातील प्रगती तसेच संस्थागत वितरणासाठी सामाजिक पायाभूत सुविधेत मानवकेंद्रित विकासाचे माॅडेल सादर केले. जगासमाेर ते आज आदर्श बनले आहे. भारताने उचललेल्या माेठ्या पावलांची जगभरात चर्चा हाेत आहे. n ज्या देशाला आतापर्यंत एक बाजारपेठ म्हणून पाहिले जात हाेते, ताे आता जागतिक आव्हानांचे उत्तर म्हणून समाेर येत आहे.

एक लाख प्रतिनिधींनी पाहिला ‘४डी’ भारतदेशभरात २००हून अधिक विभागीय बैठकांच्या माध्यमातून जी-२० देशांच्या एक लाखाहून जास्त प्रतिनिधींनी विविध भागात जाऊन ‘४डी’ भारत पाहिला. ‘४डी’ म्हणजे, भारताची डेमाेग्राफी, डेमाेक्रेसी, डायव्हर्सिटी आणि डेव्हलपमेंट. यामुळे गेल्या दशकात लाेक कसे सक्षम झाले आहेत, हे या प्रतिनिधींनी पाहिले, असे पंतप्रधान म्हणाले.

सारेच झाले चकितजगाला ज्या उपायांची गरज आहे, त्यापैकी अनेक उपाय आपल्या देशात वेगाने आणि माेठ्या प्रमाणावर आधीपासून यशस्वीरीत्या लागू झाले आहेत. हे पाहून प्रतिनिधी चकित झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यूएनमध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व हवेजगाच्या बदलत्या स्वरुपानुसार संयुक्त राष्ट्रात सुधारणांचे पंतप्रधानांनी जाेरदार समर्थन केले. २१व्या शतकात २०व्या शतकातील मध्यकालीन वृत्ती चालू शकत नाही. सर्व पक्षांचे संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रतिनिधित्व हवे, हे सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या सुधारणा झाल्या पाहिजे, असे माेदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपा