दिवाळी मेसेजेसमध्येही चीनची टर उडवण्याची धूम
By Admin | Updated: October 28, 2016 21:19 IST2016-10-28T19:14:07+5:302016-10-28T21:19:07+5:30
सोशल मीडियावरून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छांचे संदेश पाठविण्यात तरुणाई व्यस्त आहे, यातही विशेष म्हणजे सध्या चर्चेत असलेला मुद्दा चिनी वस्तूंवर बहिष्कार....

दिवाळी मेसेजेसमध्येही चीनची टर उडवण्याची धूम
सागर सिरसाट / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - दीपावलीच्या शुभेच्छांचा सोशल मीडियावर सध्या अक्षरश: वर्षाव होत आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर, हाईक, ई-मेलवर मेसेज पाठवताना दीपावलीच्या आनंदाला अधिकच उधाण आले आहे. काल (ता. 27) रात्रीपासूनच सोशल मीडियावर संदेश पाठविण्यास सुरूवात झाली असून विविध आशयाचे संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांच्या रात्रीही जागल्या. सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छांचे संदेश पाठविण्यात तरुणाई व्यस्त आहे, यातही विशेष म्हणजे सध्या चर्चेत असलेला मुद्दा चिनी वस्तूंवर बहिष्कार.... दिवाळीच्या शुभेच्छा देतानाही चायना मेडला लक्ष्य करण्यावरच तरूणाईने भर दिलाय. दीपावली साजरी करा मात्र, चिनी वस्तूंवर बहिष्कार कायम ठेवा असेच काहीसे संदेश फिरत आहेत.
एक नजर सोशल मीडियावरच्या मेसेजेसवर-