शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:30 IST

'भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.'

PM Narendra Modi on Budget : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(2 फेब्रुवारी) दिल्लीतील आरके पुरम येथे जाहीर सभेला संबोधित करताना मागील काँग्रेस सरकारांवर निशाणा साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी कर सवलतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'तुम्ही नेहरुजींच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते, तर तुमच्या पगाराच्या एक चतुर्थांश रक्कम सरकारने परत घेतली असती.'

यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणतात, 'आज जर पंडीत नेहरुंचा काळ असता, तर 12 लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर भरावा लागला असता. इंदिरा गांधींचा काळ असता तर 12 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये करात गेले असते. 10-12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 12 लाख रुपयांवर 2 लाख 60 हजार रुपये कर भरावा लागायचा. पण, भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.'

'12 ते 24 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्रतिवर्षी 1 लाख 10 हजार रुपयांची अतिरिक्त बचत होईल. आजचा भारत भाजपसोबत आहे. या अर्थसंकल्पात गरिबांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरिबांसाठी आहे. मध्यमवर्गीयांसाठी हा सर्वात अनुकूल अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे भारतातील प्रत्येक कुटुंब आनंदी आहे. 12 लाखांच्या उत्पन्नावर शून्य करामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपयांची बचत होणार आहे. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांचा खिसा भरणारा अर्थसंकल्प आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आयकरात एवढा मोठा सवलत देण्यात आली आहे,' असा दावाही पीएम मोदींनी यावेळी केला.

'आप'ने दिल्लीची 11 वर्षे उद्ध्वस्त केलीयावेळी पीएम मोदींनी दिल्लीतील आप सरकारवरही निशाणा साधला. 'वसंत पंचमीपासून हवामान बदलण्यास सुरुवात होते. दिल्लीत 5 फेब्रुवारीला विकासाचा नवा झरा वाहणार अन् दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार. यावेळी संपूर्ण दिल्ली भाजपसोबत आहे. आपने दिल्लीची 11 वर्षे उध्वस्त केली. मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुमच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.'

'दिल्लीत मतदानापूर्वीच झाडूच्या काढ्या बाहेर पडत आहेत. आपचे नेते पक्षावर आरोप करत राजीनामे देत आहेत. यावरुनच आम आदमी पक्षावर जनता नाराज असल्याचे सिद्ध होते. दिल्लीतील जनतेच्या रोषाला आप एवढी घाबरली आहे की, दर तासाला खोट्या घोषणा करत आहे. पण आपचा मुखवटा आता गळून पडला आहे. यंदा दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपBudgetअर्थसंकल्प 2024Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन