शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मोदींच्या काळात कृषी क्षेत्राची कर्जवृद्धी नीचांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:53 IST

मोबदल्याची शेतकऱ्यांना नाही खात्री; बँकांही देण्यास नाखूश

नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याची घोषणा केली असली तरी अपुºया गुंतवणुकीमुळे ४ वर्षांत कृषी क्षेत्राची अवस्था चिंताजनक बनली आहे. रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालानुसार मे २0१८ मधे कृषी क्षेत्राच्या कर्जवृद्धीचा दर ३.८ टक्क्यांवर आला आहे. मार्च २0१४ मधे तो १५ टक्के होता.कृषी क्षेत्राला बँकांकडून होणाºया कर्ज पुरवठ्याचे प्रमाण चार पटींनी खाली का आले? याचे उत्तर मोदी सरकारकडे नाही. शेतकºयांच्या बिकट अवस्थेवर विरोधी पक्ष कायमच सरकारवर हल्ले चढवत आहे. तथापि रिझर्व बँकेच्या अहवालाने एक मजबूत शस्त्र विरोधकांना पुरवले आहे.घसरण का? तज्ज्ञांनी दिली दोन कारणेकृषीमालाचा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी निराश आहे. शेतीत गुंतवणूक करण्यास बँकांकडून कर्ज घेण्याची त्याला भीती वाटते. पुरेसा मोबदला मिळेलच याची खात्री वाटत नाही. शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री उद्योगाची अवस्थाही बिकटच. भाव पडल्यामुळे नफ्यात लक्षणीय घट झाली आहे. या क्षेत्रात नवी गुंतवणूक फारच कमी असल्याने पूरक उद्योगांसाठी बँकेच्या कर्जाची मागणीही घटली.कर्जमाफी देणारी राज्येदोन भाजपा : उत्तर प्रदेशमध्ये एक लाखांपर्यंतचे, महाराष्ट्रात एकूण ३४ हजार २२ कोटींची कर्जमाफीदोन काँग्रेस : पंजाब सरकारने (रकमेचा अंदाज नाही) आणि कर्नाटकातही एक लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा कुमारस्वामींनी केली.बँका अधिक सावधकर्जमाफीच्या घोषणांमुळे तोट्यातील बँका सावध झाल्या. कर्ज माफ होईलच या आशेने शेतकरी वेळेत परतफेड करतील का, याची बँकांना शंका वाटते. सहकारी बँका अन् मायक्रो फायनान्सिंग संस्था शेतकºयांना कर्ज पुरवठा करतात. माफ केलेल्या कर्जाची भरपाई सरकार कधी व कशी करणार, हे स्पष्ट नाही. कर्जमाफीचा विपरीत प्रभाव ताळेबंदांवर पडू नये, यासाठी बँका सावधपणे कर्जपुरवठा करीत आहेत. अन्य संस्थांमध्येही या घोषणेमुळे चुकीचा संदेश गेलाय. याचा परिणाम कृषी क्षेत्रात कर्जाचे प्रमाण खूपच घटले आहे. मोदी सरकारचे हे मोठे अपयश मानले जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा