शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या काळात राजकीय जाहिरातींवर अंकुश ठेवू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:00 IST

निवडणूक आयोगाने पडताळणी न केलेल्या राजकीय जाहिराती न दाखवण्याचे किंवा मजकूर न टाकण्याचे निर्देश समाजमाध्यमांना देऊ. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : निवडणूक आयोगाने पडताळणी न केलेल्या राजकीय जाहिराती न दाखवण्याचे किंवा मजकूर न टाकण्याचे निर्देश समाजमाध्यमांना देऊ. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली.यासंबंधी आयोग व गूगल, ट्विटर, फेसबुक तसेच अन्य समाजमाध्यमांबरोबर मंगळवारी बैठक असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे वकील प्रदीप राजगोपाल यांनी मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाला दिली.राजकीय जाहिरातींवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात व देशहितासंदर्भात कोणत्या जाहिराती आहेत, हे मंगळवारच्या बैठकीत ठरविण्यात येईल, असे राजगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले.निवडणूक जवळ आल्याने समाजमाध्यमांवर पेड न्यूजच्या स्वरूपात अनेक खोट्या बातम्या दाखविण्यात येतात. त्यांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाला समाजमाध्यमांवर अंकुश घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले सागर सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींवर किंवा मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कोणकोणत्या नियमांचे पालन करावे लागेल, याचा मसुदा न्यायालयात सादर केला.निवडणूक आयोगाने पडताळणी न केलेल्या जाहिरातींबाबत नोटीफिकेशन देण्यात येईल. त्यानंतर समाजमाध्यमांना ती जाहिरात किंवा मजकूर तत्काळ हटवावा लागेल, असेही राजगोपाल यांनी सांगितले.उच्च न्यायालयाला हमीतर, फेसबुकने आपण आगामी लोकसभा निवडणुका विचारात घेऊन देशहितासाठी फेसबुकवरील सर्व राजकीय जाहिराती व मजकूर काटेकोरपणे पडताळण्यात येईल, असे न्यायालयाला गेल्या सुनावणीत सांगितले होते . त्याशिवाय ट्विटर आणि यूट्युबनेही निवडणूक आयोगाने पडताळणी केल्यानंतरच राजकीय जाहिराती प्रसारित करू, अशी हमी न्यायालयाला दिली होती. 

टॅग्स :AdvertisingजाहिरातElectionनिवडणूकFacebookफेसबुकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक