घरफोडी करताना रंगेहात पकडले
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:16+5:302015-02-18T23:54:16+5:30
घरफोडी करताना रंगेहात पकडले

घरफोडी करताना रंगेहात पकडले
घ फोडी करताना रंगेहात पकडलेनागपूर : खिडकीची सळाख तोडून चोरीच्या उद्देशाने आत प्रवेश करणाऱ्या आरोपीविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुर्गा व्यंकट रवी (३८) यांच्या बेलिशॉप रेल्वे क्वॉर्टरमध्ये मंगळवारी दुपारी ४.३० वाजता आरोपी राज जीवलाल चंद्रहास (३२) रा. गोधनी, म्हाडा क्वॉर्टर कोराडी हा खिडकीची सळाख तोडून आत प्रवेश करीत होता. आरोपीला रंगेहाता पकडून दुर्गा रवी यांनी पाचपावली पोलिसांकडे सोपविले. पाचपावली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.