शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

प्रवाशांसाठी खुशखबर... ९ ऑक्टोबरपासून दुरंतो अन् विदर्भ एक्स्प्रेस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 15:11 IST

प्रवाशांची मागणी फळाला : मध्य रेल्वे मुंबई विभागातून नव्याने पाच गाड्या होणार सुरू

अमरावती : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २४ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ आहे. परिणामी रेल्वे गाड्यांची चाकेसुद्धा थांबली आहे. मात्र, अनलॉकमध्ये काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहेत. मुंबई मध्य रेल्वे विभागातून नव्याने पाच गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर - मुंबई दुरंतो सुपरफास्ट ही गाडी ९ ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहे. याबाबतची अधिसूचना ६ आॅक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- नागपूर (गाडी क्रमांक ०२२८९) ही १० आॅक्टोबर, तर नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (गाडी क्रमांक ०२२९०) दुरंतो एक्स्प्रेस ही गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज धावणार आहे. सीएसएमटी- गोंदिया (गाडी क्रमांक ०२१०५) ही ट्रेन ९ आॅक्टोबर, तर गोंदिया- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१०६) विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज धावणार आहे. या दोन्ही रेल्वे गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांना ये-जा करणे सुकर होणार आहे. पूर्वीच्याच रेल्वे स्थानकावर दुरंतो, विदर्भ एक्स्प्रेसला थांबा असणार आहे. आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, अशी माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली. अहमदाबाद, मुंबईकडे ये-जा करण्यासाठी हावडा- मुंबई मेल, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेसदेखील आता दररोज सुरू आहे.सीएसएमटी- पुणे, सुरत एक्स्प्रेस सुरू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पुणे (गाडी क्रमांक ०२१२३), पुणे-सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१२४), सीएसएमटी- पुणे (०२०१५), पुणे- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२०१६), सीएसएमटी- सुरत (गाडी क्रमांक ०२११५), सुरत- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२११६) या सुपर फास्ट गाड्या ९ आॅक्टोबरपासून दररोज धावणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकMumbaiमुंबई