मुंबईला येणारी दुरंतो एक्स्प्रेस कर्नाटकात घसरली, २ ठार ८ जखमी

By Admin | Updated: September 12, 2015 08:35 IST2015-09-12T08:35:58+5:302015-09-12T08:35:58+5:30

पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईकडे येणारी दुरांतो एक्स्प्रेस कर्नाटकातील कलबुर्गीजवळ घसरली. रेल्वेचे ९ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या

Duranto Express coming to Mumbai collapsed in Karnat, 2 killed and 8 injured | मुंबईला येणारी दुरंतो एक्स्प्रेस कर्नाटकात घसरली, २ ठार ८ जखमी

मुंबईला येणारी दुरंतो एक्स्प्रेस कर्नाटकात घसरली, २ ठार ८ जखमी

>ऑनलाइन लोकमत
कलबुर्गी (कर्नाटक), दि. १२ - आज शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईकडे येणारी दुरांतो एक्स्प्रेस कर्नाटकातील कलबुर्गीजवळ घसरली. रेल्वेचे ९ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या या अपघातात २ प्रवासी ठार झाले असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेने मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
कलबुर्गीपासून २० किलोमीटर अंतरावरील मारतूर येथे हा अपघात घडला. बचावकार्य संपुष्टात आले असून अपघातामागच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातासंदर्भातले हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे: गुलबर्गा: ०८४७-२२५५०६६ / २२५५०६७, सिकंदराबाद: ०४० - २७७००९६८, सोलापूर: ०२१७ - २३१३३३

Web Title: Duranto Express coming to Mumbai collapsed in Karnat, 2 killed and 8 injured