गिीखदानमध्ये हुंडाबळी
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:28+5:302015-07-10T23:13:28+5:30
नागपूर : हुंड्यासाठी नवरा आणि सासरची मंडळी छळत असल्यामुळे एका विवाहितने स्वत:ला जाळून घेतले. गिीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलैला ही करुणाजनक घटना घडली. निखंत अन्सारी ताज अन्सारी (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

गिीखदानमध्ये हुंडाबळी
न गपूर : हुंड्यासाठी नवरा आणि सासरची मंडळी छळत असल्यामुळे एका विवाहितने स्वत:ला जाळून घेतले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलैला ही करुणाजनक घटना घडली. निखंत अन्सारी ताज अन्सारी (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मुळची मुंबई येथील रहिवासी असलेल्या निखंतचा गेल्या वर्षी जगदीश नगरात गौतम किराणा दुकानामागे राहाणाऱ्या ताज अन्सारीसोबत विवाह झाला होता. लग्नात १ लाखांचा हुंडा कबूल करून ७० हजार रुपयेच मिळाल्यामुळे आणि दागिनेही मनासारखे मिळाले नसल्यामुळे आरोपी नवरा तसेच त्याचे नातेवाईक मेहजबिन अन्सारी आणि जलाल अन्सारी तसेच अलताफ अन्सारी निखंतचा छळ करीत होते. हा छळ असह्य झाल्यामुळे निखंतने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. हुंड्यासाठीच तिचा बळी घेतल्याची तक्रार निखंतचे वडील जाकिर गफ्फार अन्सारी (वय ४५, रा. तारदेव मुंबई) यांनी गिट्टीखदान ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त चार आरोपींविरुध्द कलम ३०४ (ब), ४९८ (अ), ३४ भादंवि तसेच सहकलम ३,४ हुंडा प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंदविला.---