प्रकृती अस्वास्थ्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रुग्णालयात दाखल

By Admin | Updated: April 26, 2016 09:31 IST2016-04-26T09:28:09+5:302016-04-26T09:31:56+5:30

छातीत दुखू लागल्याने व श्वसनास त्रास होऊ लागल्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले

Due to unhealthy health problems, the External Affairs Minister Sushma Swaraj admitted to the hospital | प्रकृती अस्वास्थ्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वास्थ्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रुग्णालयात दाखल

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - छातीत दुखू लागल्याने व श्वसनास त्रास होऊ लागल्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
स्वराज यांना सोमवार सकाळपासूनच छातीत दुखत होतं, मात्र संध्याकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन स्वराज यांची विचारपूसही केली. 
स्वराज यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या असून आज त्याचे अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळेल, असं एम्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
 

Web Title: Due to unhealthy health problems, the External Affairs Minister Sushma Swaraj admitted to the hospital