आघाडी, महायुतीच्या गोंधळामुळे दमछाक
By Admin | Updated: September 25, 2014 04:09 IST2014-09-25T04:09:49+5:302014-09-25T04:09:49+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन १० दिवसांचा कालावधी उलटला तरी आघाडी आणि महायुतीचे जागावाटप झालेले नाही

आघाडी, महायुतीच्या गोंधळामुळे दमछाक
मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन १० दिवसांचा कालावधी उलटला तरी आघाडी आणि महायुतीचे जागावाटप झालेले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी खूपच कमी कालावधी मिळणार असल्याने घराघरापर्यंत पोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करुन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वीपासून आघाडी आणि युतीचे जागावाटपावरुन घोडे अडले आहे. निवडणूक अर्ज भरण्यास अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असतानाही आघाडी युतीची घोषणा
आणि उमेदवारांची यादी जाहीर
झाली नसल्याने इच्छुकांची झोप उडाली आहे. प्रत्येक मतदारसंघात विविध पक्षांचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. विधानसभा मतदारसंघ लहान असला तरी घराघरापर्यंत पोहचण्यासाठी ऐवढा वेळ
अपुरा पडणार आहे. यामध्येच सभा आणि पक्षांचे इतर कार्यक्रम यामुळे पंधरा दिवस प्रचारासाठी कमी असल्याचे, उमेदवारांनी सांगितले. (प्रतिनिधी)