शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट ,पावसाने दिला महिन्याचा ब्रेक ८१ टक्के क्षेत्रावर झाल्या पेरण्या, तूर, सोयाबीनचे प्रमाण जास्त, काही भागात पेरणीच नाही

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

बार्शी: पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटून गेला तरी बार्शी तालुक्यात वरुणराजाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्याने व काही भागात काहीच न पडल्याने खरीप हंगामात ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही भागात उन्हाळादेखील मोडला नसल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत़ शेतकरी अक्षरश: सैरभैर झाला आहे़ याचबरोबर पाऊस पडेनासा झाल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे़

बार्शी: पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटून गेला तरी बार्शी तालुक्यात वरुणराजाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्याने व काही भागात काहीच न पडल्याने खरीप हंगामात ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही भागात उन्हाळादेखील मोडला नसल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत़ शेतकरी अक्षरश: सैरभैर झाला आहे़ याचबरोबर पाऊस पडेनासा झाल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे़
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे एक जून ते दहा जून या कालावधीत तालुक्याच्या काही भागात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली़ त्यामुळे जूनमध्ये काही शेतकर्‍यांनी तो आणखीन पडेल या आशेने आहे त्या ओलीवर सोयाबीन, तूर, कापूस, उडीद,मूग आदी पिकांच्या पेरण्या उरकून घेतल्या़ ही परिस्थिती तालुक्यातील जवळपास पंचवीस ते तीस गावांत आहे़ मात्र उर्वरित तालुक्यांतील जवळपास बहुतांश गावात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पेरणीच झाली नाही़ ज्या शेतकर्‍यांनी धाडस करुन पेरणी केली त्यांची पिके चांगल्या प्रमाणात उगवून आली मात्र १४ जूननंतर तब्बल एक महिना झाला पावसाने दडी मारल्यामुळे ही पिके माना टाकून सुकत आहेत़ त्यामुळे शेतकरी वर्गाबरोबरच सर्वच लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
खरिपाची पिके ही शेतकर्‍यांसाठी पैसे मिळवून देणारी असतात तसेच खरिपाच्या हंगामात चांगले उत्पादन झाल्यास दसरा,दिवाळी, गौरी गणपती आदी सणांबरोबरच रब्बी हंगामात पुढील शेतीच्या मशागतीसाठी शेतकर्‍यांना पैसे उपलब्ध होतात़ मात्र यंदा खरिपाचा हंगाम वाया गेल्यातच जमा आहे़
याचबरोबर मागील पंधरा ते वीस दिवसांपासून दररोज सकाळी ढग येत आहेत़ त्यामुळे पाऊस पडेल असे वाटत असतानाच दुपारनंतर ढग गायब होत असल्यामुळे रोजच निराशा होत आहे़ मागील तीन-चार दिवसांपासून वार्‍याबरोबरच कडक उन्हाचे प्रमाणदेखील वाढू लागल्यामुळे कशीबशी आलेली पिके सुकू लागली आहेत़
कोट
जुलैअखेरपर्यंत खरीप हंगामातील तूर, सोयाबीन हे पिके येऊ शकतात, मात्र त्यासाठी येत्या आठवडाभरात पाऊस पडणे अत्यंत गरजेचे आहे़ बार्शी तालुक्यातील काही गावात झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी जेमतेम पावसावर पेरण्या उरकल्या आहेत, मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे़
राजेंद्र चौधरी
तालुका कृषी अधिकारी
चौकट
बार्शी तालुक्यात खरीप हंगामात सरासरी २७१४४ हे़ क्षेत्रापैकी २२०५९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ८१ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ यामध्ये मका ७८७ हे़, तूर ४९५७, उडीद २९६५, मूग ७४८,सोयाबीन १२१६८,कापूस २७८ हे़ या पिकांचा समावेश आहे़ बहुतांश शेतकर्‍यांनी सोयाबीन व तूरची पेरणी जास्त केल्याचे दिसत असून ही पिके लांबलेल्या पावसामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे़