खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: August 1, 2015 23:06 IST2015-07-31T22:25:13+5:302015-08-01T23:06:27+5:30
नाशिक : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या इसमास फिट येऊन तो पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना खंबाळे येथे शुक्रवारी (दि़३१) सकाळच्या सुमारास घडली़ याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे पेठ येथील मात्र सद्यस्थितीत सातपूरच्या प्रबुद्धनगरमधील रहिवासी भास्कर लहानू पवार (३२) हे शुक्रवारी सकाळच्या सुमारास खंबाळे येथील आहोळात खेकडे पकडण्यासाठी गेले होते़ खेकडे पकडत असताना त्यांना फिट असल्याने ते ओहोळातील पाण्यात पडले व त्यांचा बुडून मृत्यू झाला़ या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़ (प्रतिनिधी)