नवी दिल्ली : कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे सरकारी कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) तीन उर्जा प्रकल्पांतील वीज निर्मिती धोक्यात आली आहे. कोळशाचा वेळीच पुरवठा न झाल्यास सुमारे 5,क्क्क् मेगाव्ॉट क्षमतेचे हे प्रकल्प बंद पडून विजेअभावी संपूर्ण उत्तर भारतातील दैनंदिन जीवन ठप्प होण्याची भीती आहे.
देशातील सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी असलेल्या एनटीपीसीच्या छत्तीसगडमधील सिपात आणि हरियाणातील बादरपूर व झज्जार येथील प्रकल्पातील कोळसा साठा 28 ऑगस्ट रोजी शून्यावर आला आहे. केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाच्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. झज्जार प्रकल्प हा दिल्ली आणि हरियाणा सरकार व एनटीपीसी यांचा संयुक्त उपक्रम आहे.
गेल्या 1क् दिवसांपासून या प्रकल्पातील स्थिती ढासळत चालली आहे. इंधनाच्या तुटवडय़ामुळे झज्जार येथील प्रकल्पातून एकूण क्षमतेच्या एक-तृतीयांश एवढीच वीजनिर्मिती होत आहे. या प्रकल्पाची क्षमता 1,5क्क् मेगाव्ॉट एवढी आहे. महानदी आणि नॉर्दन कोलफील्डमधून या प्रकल्पाला कोळसा पुरवठा होतो तर येथून हरियाणा, पंजाब, राजस्थान, तेलंगण आदी राज्यांना वीज पुरवठा
होतो.
एनटीपीसीच्या 7क्5 मेगाव्ॉट क्षमता असलेल्या बादरपूर प्रकल्पालाही कोळसा टंचाईची समस्या भेडसावत आहे. कोळसा पुरवठा पूर्ववत न झाल्यास या प्रकल्पाच्या वीजनिर्मिती क्षमतेतही मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. 2,98क् मेगाव्ॉट क्षमता असलेल्या सिपात प्रकल्पातील एका संचाची वीजनिर्मिती कोळशाअभावी अगोदरच बंद पडली असून उर्वरित संचही ठप्प पडण्याची भीती आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील सुमारे एक-चतुर्थाश म्हणजेच 1क्क् औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांकडे चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. अन्य 27 पैकी सहा प्रकल्पांतील कोळसा साठा गुरुवारीच संपला आहे. यापैकी निम्याहून अधिक प्रकल्पांकडे आठवडाभरापुरताच साठा आहे.
4अन्य एका आकडेवारीनुसार, शुक्रवारी उत्तरेकडील राज्यांमध्ये अधिक मागणीच्या काळात 5,323 मेगाव्ॉट विजेची टंचाई उद्भवली. या काळात 5क्,61क् मेगाव्ॉट विजेची मागणी असताना केवळ 45,287 मेगाव्ॉट एवढाच पुरवठा झाला.