वसुलीसाठी आटापिटा.... ७० टक्के उद्दीष्ट: ९ कर्मचार्‍यांचे पगार रोखले

By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:13+5:302016-02-08T22:55:13+5:30

जळगाव : महापालिकेकडून घरप˜ी वसुलीवर भर देण्यात येत असून फेब्रुवारी अखेर ६० टक्के वसुली केली जावी असे आदेश देण्यात आले आहेत. याकडे दुर्लक्ष करणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन रोखले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. तर गेल्या महिन्यात कामात कुचराई करणार्‍या ९ जणांचे पगार रोखण्यात आले आहेत.

Due to recovery ... 70 percent of the target: 9 employees' salary halted | वसुलीसाठी आटापिटा.... ७० टक्के उद्दीष्ट: ९ कर्मचार्‍यांचे पगार रोखले

वसुलीसाठी आटापिटा.... ७० टक्के उद्दीष्ट: ९ कर्मचार्‍यांचे पगार रोखले

गाव : महापालिकेकडून घरप˜ी वसुलीवर भर देण्यात येत असून फेब्रुवारी अखेर ६० टक्के वसुली केली जावी असे आदेश देण्यात आले आहेत. याकडे दुर्लक्ष करणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन रोखले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. तर गेल्या महिन्यात कामात कुचराई करणार्‍या ९ जणांचे पगार रोखण्यात आले आहेत.
एलबीटी बंद झाल्याने हक्काची वसुली म्हणजे मालमत्ता कर. त्याकडे बर्‍याच वेळस प्रभाग समित्यांकडून दुर्लक्ष होत असते. परिणामी पगार देणेही बर्‍याच वेळस कठिण जात असल्याची परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक महिन्यासाठी टार्गेट निि›त करून देण्यात आले आहे. जानेवारीत या अंतर्गत बर्‍यापैकी कामकाजही झाले.
६५ कोटींची मागणी
मालमत्ता कराची शहरातील सुमारे ८० हजार मिळकत धारकांकडून ६५ कोटींची मागणी आहे. त्यातच व्यापारी संकुलकांमधील घोळही बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे मोठा निधी वसूल होत नाही. विविध उपनगरांमधील मालमत्ता धारकांकडून होईल तेवढी वसुली करण्याचा प्रत्यन असतो. आता मात्र फेबु्रवारीअखेर कोणत्याही परिस्थितीत ७० टक्के वसुली केली जावी असे आदेश देण्यात आले आहेत.
९ जणांचे रोखले पगार
घरप˜ी वसुलीसाठी प्रभाग निहाय पथके आहेत. मात्र तसेच प्रभाग कार्यालयांमध्येही हे कामकाज सुरू असते. गेल्या महिन्यात ठरवून देण्यात आलेले उद्दीष्ठ पूर्ण न करणार्‍या ९ लिपीकांचे पगार रोखण्यात आले आहेत. तर यापुढेही याच पद्धतीने कामकाज केले जाईल, असा इशारा संबंधित कर्मचार्‍यांना देण्यात आला आहे. काही प्रभाग समित्यांमध्ये रविवारीही कामकाज सुरू ठेवण्यात आले होते असे मनपा सूत्रांनी सांगितले.

Web Title: Due to recovery ... 70 percent of the target: 9 employees' salary halted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.