अवकाळी गारपिटीने दहा हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30

कृषी विभागाचा अंदाज, नऊ तालुक्यांना फटका, वडनेरला गारपीट

Due to the recent hailstorm damage of ten thousand hectares crops | अवकाळी गारपिटीने दहा हजार हेक्टर पिकांचे नुकसान

अवकाळी गारपिटीने दहा हजार हेक्टर पिकांचे नुकसान

षी विभागाचा अंदाज, नऊ तालुक्यांना फटका, वडनेरला गारपीट
नाशिक : जिल्‘ात अवकाळी पावसाचे व गारपिटीचे थैमान सुरूच असून, गुरुवारी (दि.११) जिल्‘ात सात तालुक्यांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला दिला आहेत.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जिल्‘ात काही तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, कांदा, डाळींब, गहू, हरबरा पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने प्राथमिक नुकसान झालेल्या गावांची नावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- कंसात झालेल्या पिकांचे नुकसान- बागलाण- ब्राšाणगाव, लखमापूर, यशवंतनगर,धांद्री, (कांदा, द्राक्ष, डाळींब), चांदवड- मंगरूळ, सोग्रस, चिंचोले, भरवीर, साळसाने (कांदा व द्राक्ष) निफाड-रूई, सारोळेथडी, धारणगाव वीर, खेडलेझुंगे, नांदूरमधमेश्वर,महादेवनगर, विंचूर, देवगाव, मानूर (द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा) सुमारे एक हजार हेक्टर, मालेगाव- रावळगाव, तळवाडे, दुधे, सातमाने, वडनेर (खा), मोडदर, निमशेवडी, वडेल, अजंग, खायदे (डाळींब, गहू व हरभरा), येवला- मानुरी, मुखेड, देवगाव, एरंडगाव (द्राक्ष, कांदा), देवळा-वासूळपाडा, महालपाटणे, निंबोळा, वाखारी, डोंगरगाव, पिंपळगाव, उमराणे (कांदा, डाळींब) सिन्नर- मुसळगाव, खोपडी, कुंदेवाडी (कांदा, हरभरा, गहू), नांदगाव-जळगाव(बु.) चिंचविहीर (कांदा, हरभरा, गहू) आदि गावांमध्ये सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.(प्रतिनिधी)
इन्फो..
वडनेरला गारपीट
गुरुवारनंतर शुक्रवारी पुन्हा चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावासह अन्य काही भागांत गारपीट झाली. वडनेर भैरव गावात झालेल्या गारपिटीने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ज्योती बाळासाहेब माळी यांंनी दिली. तसेच नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी ज्योती बाळासाहेब माळी यांनी केली आहे.
इन्फो..
रब्बीच्या पेरण्यांना वेग
गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला असून, मागील आठवड्यापर्यंत अवघ्या २७ टक्के क्षेत्रावर असलेल्या रब्बी पेरण्या शुक्रवारी (दि, १२) सुमारे ४० टक्के क्षेत्रावर पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र २ १ लाख ३२ हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी ५७ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या आटोपल्या आहेत. पेरण्या झालेल्या क्षेत्रापैकी प्रामुख्याने गहू- २८ हजार ९८८ हेक्टर, हरभरा - २१ हजार ४६७, ज्वारी- ४८९०, तृणधान्य-३६०९, कडधान्य-३०९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत.

Web Title: Due to the recent hailstorm damage of ten thousand hectares crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.