बलात्काराच्या घटनांमुळे भारतीय विद्यार्थ्याला जर्मनीत इंटर्नशिप नाकारली

By Admin | Updated: March 9, 2015 18:38 IST2015-03-09T18:31:07+5:302015-03-09T18:38:01+5:30

जर्मनीतील एका ख्यातनाम विद्यापीठाने बलात्काराच्या प्रकरणांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Due to rape, Indian student refused internship in Germany | बलात्काराच्या घटनांमुळे भारतीय विद्यार्थ्याला जर्मनीत इंटर्नशिप नाकारली

बलात्काराच्या घटनांमुळे भारतीय विद्यार्थ्याला जर्मनीत इंटर्नशिप नाकारली

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ९ - निर्भया प्रकरणावरील डॉक्यूमेंटरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की झाल्याचा आरोप होत असतानाच जर्मनीतील एका ख्यातनाम विद्यापीठाने बलात्काराच्या प्रकरणांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भारतात राहणा-या एका विद्यार्थ्याने जर्मनीतील ख्यातनाम लिपझिग विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री विभागात इंटर्नशिपसाठी ईमेलद्वारे अर्ज केला होता. या तरुणाला विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख एनेट बेक सिकिंगर यांनी ईमेलद्वारे उत्तर दिले आहे. यात त्या म्हणतात, भारतात बलात्काराच्या घटना आम्ही दर आठवड्याला वाचत असतो. आमच्या विभागात बहुसंख्य महिला असल्याने आम्ही ही मानसिकता खपवून घेत नाही किंवा अशा मानसिकेतला पाठिंबाही देत नाही. यामुळे आम्ही आमच्या विभागात भारतीय मुलांना इंटर्नशिप देऊ शकत नाही. विद्यापीठाकडून आलेले उत्तर बघून विद्यार्थ्याला धक्काच बसला. विद्यार्थ्याच्या सहका-याने हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांसमोर मांडला आहे. 
भारतातील जर्मनीचे राजदूत मायकल स्टिनर यांनी या प्रकारावर नाराजी दर्शवली. भारत हा बलात्का-याचा देश नाही असे सांगत त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या प्रकारावरुन टीका सुरु होताच सिकिंगर यांनी घुमजाव केले. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, आम्ही भारतीय विद्यार्थ्यांचे नेहमीच स्वागत केले आहे असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Due to rape, Indian student refused internship in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.