बलात्काराच्या भीतीने तरुणीने दुस-या मजल्यावरुन मारली उडी

By Admin | Updated: March 7, 2016 09:30 IST2016-03-07T09:30:27+5:302016-03-07T09:30:27+5:30

प्रियकराने आपल्या मित्रांसोबत प्रेयसीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हावडा येथे घडली आहे

Due to rape, the girl looted from the second floor | बलात्काराच्या भीतीने तरुणीने दुस-या मजल्यावरुन मारली उडी

बलात्काराच्या भीतीने तरुणीने दुस-या मजल्यावरुन मारली उडी

>ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. ७ - प्रियकराने आपल्या मित्रांसोबत प्रेयसीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हावडा येथे घडली आहे. पिडीत तरुणीने आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या दुस-या मजल्यावरुन उडी मारली. तरुणीच्या डोक्याला जखम झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे. 
 
पिडीत 20 वर्षीय तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याचे दोन मित्रही तिथे उपस्थित होते. पिडीत तरुणीला शीतपेयामधून गुंगीच औषध देण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तरुणीने बाल्कनीच्या दिशेने पळ काढला आणि उडी मारली. 
 
काही स्थानिकांनी तरुणीला इमारतीतून उडी मारताना पाहिलं. त्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात भर्ती केलं. तसंच आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी तिघांना अटक केली असून चौकशी करत आहेत. 
 

Web Title: Due to rape, the girl looted from the second floor