ऑनलाईन उतार्‍यामुळे करमाळ्यातील व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:33+5:302015-08-31T00:24:33+5:30

करमाळा : ऑनलाईन उता-यात चुका झाल्याने व ऑनलाईन उता-याशिवाय व्यवहार होत नसल्याने करमाळ्यात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत़ ऑनलाईन उतार्‍यामुळे एकूणच व्यवहार ऑफलाईन झाल्याने तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक दस्त नोंदणी कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे.

Due to online transit, the ban on the tax breaks | ऑनलाईन उतार्‍यामुळे करमाळ्यातील व्यवहार ठप्प

ऑनलाईन उतार्‍यामुळे करमाळ्यातील व्यवहार ठप्प

माळा : ऑनलाईन उता-यात चुका झाल्याने व ऑनलाईन उता-याशिवाय व्यवहार होत नसल्याने करमाळ्यात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत़ ऑनलाईन उतार्‍यामुळे एकूणच व्यवहार ऑफलाईन झाल्याने तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक दस्त नोंदणी कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे.
ऑनलाईन उतारा देण्याचा राज्य शासनाचा उपक्रम कौतुकास्पद असला तरी उता-यावरील नोंदी डाऊनलोड करताना मोठय़ा प्रमाणात त्यात चुका झाल्या आहेत. चुकीचे डाऊनलोड झालेले उतारे दुरुस्त केल्यानंतर तो उतारा ऑनलाईन दिसतच नाही, असा प्रकार करमाळा येथे सेतू सुविधा कार्यालयात होत असून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना शासनाच्या नियमानुसार ऑनलाईन उतारा असल्याशिवाय व्यवहार केला जात नाही. या प्रकारामुळे सध्या करमाळा येथे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झालेले असून कधी उतारे मिळतात याची वाट ग्राहक पाहत आहेत. जमीन खरेदीदार व विक्रीदार यांच्यात वादावादीचे प्रसंग होऊ लागले आहेत तर ऑनलाईन उता-यात त्रुटी असल्याने व व्यवहार होत नसल्याने बांधकाम व्यावसायिक,खरेदी विक्री करणारे,दस्त लेखक आर्थिक संकटात सापडले आहेत. वार्ताहर
-------
उता-यातील दुरुस्ती तत्काळ व्हावी. तोपर्यंत पूर्वी सुरू असलेल्या पध्दतीनुसार उतारे मिळावेत व व्यवहार नोंदवावेत, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा सचिव दिनेश घोलप,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजयराव पवार यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Due to online transit, the ban on the tax breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.