शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकाने दुर्गामातेवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 2:03 PM

दिल्ली विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापकाने ऐन नवरात्रामध्ये दुर्गामातेबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

नवी दिल्ली, दि. 24 - दिल्ली विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापकाने ऐन नवरात्रामध्ये दुर्गामातेबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्याबाबत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. केदार कुमार मंडल असे वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकाचे नाव आहे. ते. दयाल सिंह काँलेजमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 22 सप्टेंबर रोजी ही पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये वापरण्यात आलेले शब्द अत्यंत आक्षेपार्ह होते. वाद होताच या प्राध्यापकांनी ही पोस्ट आपल्या वॉलवरून हटवली. मात्र सदर पोस्टचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच केदार कुमार मंडलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्राध्यापकांनी ही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर दयाल सिंह महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा गट असलेल्या नॅशनल डेमोक्रेटिक टिचर्स फ्रंट (एनडीटीएफ) ने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केदार कुमार मंडल याच्याविरोधात भादंवि कलम 153 अ आणि 295 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   तसेच या प्राध्यापकांविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दयाल सिंह कॉलेजमध्ये चालणाऱ्या दोन्ही सत्रांमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहे. तसेच अभाविपने या प्राध्यापकांना तात्काळ  घ्यावे,  अशी मागणी केली आहे. तसेच जेएनयूमध्ये शिकलेल्या या प्राध्यापकांना काही लोकांकडून धमक्याही मिळत आहेत. दरम्यान, दोन्ही महाविद्यालांचे विद्यार्थी आणि अभाविप सोमवारी या प्रकाराविरोधात आंदोलन करणार असल्याचे  अभाविप युनिटचे अध्यक्ष वरुण यांनी सांगितले.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली