पाऊस रखडल्याने महागाई वाढणार

By Admin | Updated: June 26, 2014 00:39 IST2014-06-26T00:39:33+5:302014-06-26T00:39:33+5:30

भाताचे शेत पाण्याअभावी सुखण्याची स्थिती असून अपेक्षित उत्पादन न झाल्यास महागाई आणखी भडकण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Due to monsoon rain, inflation will increase | पाऊस रखडल्याने महागाई वाढणार

पाऊस रखडल्याने महागाई वाढणार

>नवी दिल्ली : देशभरात पाऊस रखडल्याने तेलबिया, सोयाबीन आणि भाताचे शेत पाण्याअभावी सुखण्याची स्थिती असून अपेक्षित उत्पादन न झाल्यास महागाई आणखी भडकण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 
गेल्या दहा दिवसांपासून देशात मान्सून एक इंचही पुढे सरकलेला नाही. त्यामुळे पावसाच्या दमदार आगमानानंतर महागाईला लगाम लागण्याची आशा सध्या तरी धूसर झाली आहे.  देशात सर्वदूर पावसाने जोर धरल्याशिवाय अन्नधान्याची महागाई कमी होण्याची चिन्हे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणो आहे. दोन आठवडय़ांपासून भाजीपाला व कांद्याचे दरही भडकले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने कांद्याचे किमान निर्यात मूल्य टनामागे 3क्क् डॉलर केले आहे. सरकारी गोदामांमधून बाजारात तांदूळ उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्य सरकारांनी साठेबाजांवर कारवाई करण्याची सूचनाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या आठवडय़ात केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4भाजीपाला, डाळी, भाताची लागवड यावर्षी कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आगामी तीन महिन्यात भाजीपाल्याचे भाव तिप्पट होतील, अशी भीती भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष अजय जाखड यांनी व्यक्त केली आहे. 
 
4देशातील सर्वात मोठय़ा आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरापूर्वी किलोमागे 1क् रुपयांचा दर असलेल्या कारले आणि टोमॅटोची आता 25 रुपये किलोने विक्री होत आहे. 

Web Title: Due to monsoon rain, inflation will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.