जयशंकर यांच्या विधानामुळे केंद्राचा खोटारडेपणा उघड

By Admin | Updated: October 20, 2016 04:37 IST2016-10-20T04:37:58+5:302016-10-20T04:37:58+5:30

विदेश सचिव एस. जयशंकर यांनी केलेल्या विधानावरुन मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड झाला

Due to Jayashankar's statement, the falsehood of the Center exposed | जयशंकर यांच्या विधानामुळे केंद्राचा खोटारडेपणा उघड

जयशंकर यांच्या विधानामुळे केंद्राचा खोटारडेपणा उघड


नवी दिल्ली : विदेश सचिव एस. जयशंकर यांनी केलेल्या विधानावरुन मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड झाला आहे, अशा शब्दात बुधवारी काँग्रेसने सरकारला लक्ष्य केले. यापूर्वीही सिमेपार जाऊन सैन्याने हल्ले केले होते, असे वक्तव्य एस. जयशंकर यांनी केले होते.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी अशी अपेक्षा केली आहे की, सुजाता सिंह यांच्याप्रमाणेच सत्य बोलल्याबद्दल आणि भाजपचे कपट उघड केल्यामुळे जयशंकर यांच्यावर कुऱ्हाड कोसळणार नाही. मोदी सरकारचे वक्तृत्व, फाजिल आत्मविश्वास आणि शूरपणा जयशंकर यांनी उघडा पाडला आहे. अमित शहा आणि पर्रिकर यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असेही ते म्हणाले. सरकारमधील या परस्परविरोधी वक्तव्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

Web Title: Due to Jayashankar's statement, the falsehood of the Center exposed