धुक्यामुळे रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या पाच जणांचा रेल्वेखाली दबून मृत्यू
By Admin | Updated: December 27, 2014 18:53 IST2014-12-27T18:53:51+5:302014-12-27T18:53:51+5:30
पाटणा-सासाराम-दाट धुक्यामुळे बिहारच्या रोहतास जिल्ातील कुम्हऊ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या चार मजुरांचे व एका निरीक्षकाचे अजमेर-सियालदह एक्स्प्रेसखाली दबून निधन झाले.

धुक्यामुळे रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या पाच जणांचा रेल्वेखाली दबून मृत्यू
प टणा-सासाराम-दाट धुक्यामुळे बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील कुम्हऊ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या चार मजुरांचे व एका निरीक्षकाचे अजमेर-सियालदह एक्स्प्रेसखाली दबून निधन झाले. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अरविंद कुमार रजक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मुगलसराय रेल्वे मंडळात शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम करणारे मजूर धुक्यामुळे रेल्वे चालकांना दिसले नाहीत व या मजुरांनाही ही रेल्वे येत असल्याचे समजले नाही. या मजुरांची ओळख अद्याप पटलेली नाही. सासाराम रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक अरविंद कुमार व अन्य रेल्वे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.