शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

बनावट जात प्रमाणपत्रामुळे येणार नोकरीवर कु-हाड

By admin | Updated: July 6, 2017 14:35 IST

बनावट जात प्रमाणपत्राद्वारे डिग्री किंवा नोकरी मिळवणा-यांना सर्वोच्च न्यायालयानं झटका दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - बनावट जात प्रमाणपत्राद्वारे डिग्री किंवा नोकरी मिळवणा-यांना सर्वोच्च न्यायालयानं झटका दिला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक निर्बंध लादले आहेत. जर एखादी व्यक्ती बनावट जात प्रमाणपत्रासोबत पकडली गेल्यास त्याला डिग्री आणि नोकरी गमवावी लागणार आहे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. बनावट जात प्रमाणपत्र बाळगणा-या व्यक्तीला शिक्षाही होऊ शकते, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. कोणी व्यक्ती ब-याच काळापासून नोकरी करतेय आणि ती व्यक्ती दोषी आढळली, तरीही नोकरी सोडावी लागणार आहे. नोकरी करत असताना 20 वर्षांहून अधिकचा काळ झाला असला तरी बोगस जात प्रमाणपत्रामुळे त्याला नोकरी गमवावी लागेल, त्याचबरोबर त्याच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनंही बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणा-याचं जात प्रमाणपत्र रद्द केलं जाईल, असंही सांगितलं होतं. आणखी वाचा(बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना वय उलटूनही नोकरी नाही)(आपला इण्टरव्ह्यू फसला, नोकरी गेली हातची हे कसं ओळखाल?)

आता सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय सरकारी विभागांमध्ये निर्देश जारी केले आहेत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोक-या मिळवणा-यांवर कारवाई करावी. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनीही मार्च महिन्यात लोकसभेत याबाबत माहिती दिली होती. जवळपास 1832 लोक असे आहेत की त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोक-या मिळवल्या आहेत. या कारवाईत 276 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. आणि 251 जणांवर कारवाई सुरू आहे. तसेच 1035 प्रकरणांत कायद्याची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणारी व्यक्ती कधीपासून नोकरीवर आहे हे महत्त्वाचे ठरणार नाही. एखादी व्यक्ती 20 वर्षांपासून अधिक काळ नोकरीवर असली तरी त्याची नोकरी जाणारच आहे, असे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.