दुष्काळामुळे दुग्धोत्पादनात घट हिरवा चारा नसल्याचा परिणाम : दिवसाला २ हजार लिटर्सची घट बाळासाहेब जाधव, लातूर : दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात दूध उत्पादनात घट
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30
लातूर जिल्ात ५ लाख १५० पशुधनाची संख्या आहे. त्यापैकी ३ लाख ६१ हजार ३२५ दुधाळ जनावरांची संख्या असून, यात गायी, म्हशींसह शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. या जनावरांना दिवसाकाठी ३ हजार १६६ किलो चारा लागतो. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून हिरवा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. जवळपास दिवसाला १५ हजार लिटर्सने दूध कमी झाले आहे. लातूर जिल्ात २ लाख ३२ हजार ५८४ दुधाळ गायी, म्हशी आहेत. यामध्ये जिल्हा दूध संघाकडून ७ हजार लिटर्स, सहकारी संस्थेकडून ३ हजार लिटर्स, खाजगी संकलन केंद्राकडून १८ हजार लिटर्स व बाहेरून विक्रीसाठी येणारे ८० हजार लिटर्स दूध लातूर जिल्ासाठी येते. आहे त्या दूध उत्पादनावर लातूर जिल्ातील नागरिकांची गरज भागत नाही. त्यामुळे शासकीय दूध संकलन वगळता खाजगी दूध विक्रेत्यांनी दुधाचे भाव वाढविले आहेत. दुग्धोत्पादनात घट झाल्य

दुष्काळामुळे दुग्धोत्पादनात घट हिरवा चारा नसल्याचा परिणाम : दिवसाला २ हजार लिटर्सची घट बाळासाहेब जाधव, लातूर : दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात दूध उत्पादनात घट
ल तूर जिल्ात ५ लाख १५० पशुधनाची संख्या आहे. त्यापैकी ३ लाख ६१ हजार ३२५ दुधाळ जनावरांची संख्या असून, यात गायी, म्हशींसह शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. या जनावरांना दिवसाकाठी ३ हजार १६६ किलो चारा लागतो. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून हिरवा चारा मिळत नसल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. जवळपास दिवसाला १५ हजार लिटर्सने दूध कमी झाले आहे. लातूर जिल्ात २ लाख ३२ हजार ५८४ दुधाळ गायी, म्हशी आहेत. यामध्ये जिल्हा दूध संघाकडून ७ हजार लिटर्स, सहकारी संस्थेकडून ३ हजार लिटर्स, खाजगी संकलन केंद्राकडून १८ हजार लिटर्स व बाहेरून विक्रीसाठी येणारे ८० हजार लिटर्स दूध लातूर जिल्ासाठी येते. आहे त्या दूध उत्पादनावर लातूर जिल्ातील नागरिकांची गरज भागत नाही. त्यामुळे शासकीय दूध संकलन वगळता खाजगी दूध विक्रेत्यांनी दुधाचे भाव वाढविले आहेत. दुग्धोत्पादनात घट झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. जिल्ाची लोकसंख्या २४ लाख ५४ हजार १३६ इतकी आहे. प्रती व्यक्ती अडीचशे एमएल. दुधाची गरज आहे. या सूत्राप्रमाणे प्रस्तुत लोकसंख्येचा विचार करता संकलन होणारे दूध कमी आहे. आणखी ४० हजार लिटर्स दूध दिवसाला मिळाले, तर प्रती व्यक्ती अडीचशे एमएल. दूध मिळेल. परंतु, उत्पादन घटले आहे. त्यामुळे ४० हजार लिटर्स दुधाची गरज भागविणे अशक्य झाले आहे. वरवा केला बंद... ग्रामीण भागातून शहरी भागात दूध विक्रीसाठी येणार्या विक्रेत्यांची संख्या लातूर शहरात लक्षणीय आहे. चांगल्या दर्जाचे दूध ५० ते ७० रुपये लिटर्सने आहे. शिवाय, त्यात पाणी नसेल याची खात्री नाही. त्यातच दुधाचे भाव वधारल्यामुळे शहरात अनेकांनी वरवे बंद केले आहेत. केवळ दूध घटल्यामुळे भाव वाढले असून, अनेकांनी वरवेही बंद केले आहेत. लातूर जिल्ात सहकारी संस्था, शासकीय दूध संकलन केंद्र आणि खाजगी व्यक्तींकडून संकलन झालेले दूध ४ लाख १५ हजार ७२५ लिटर्स आहे. परंतु, त्यात दिवसेेंदिवस घटच होत आहे. केवळ चारा नसल्यामुळे घट झाली असल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एस.जे. सावळकर यांनी दिली. दुधाळ जनावरांची संख्या असली तरी या जनावरांचे दूध आटत आहे. त्यामुळे दुधात घट झाली असल्याचे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त एस.एच. शिंदे यांनी सांगितले.