अवकाळीमुळे आमराईवर आली अवकाळा ज्वारी काळी ठिक्कर : फळबागेचेही मोठे नुकसान
By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, दैठणा, येरोळ, उजेड, बिबराळ, बाकली आदी सर्वच गावावर रविवारी सलग तिसर्यांदा गारपीट अन् वादळी पावसाची हॅटट्रीक झाली असून, या वादळी पावसाने ज्वारी काळी ठिक्कर पडली आहे़ त्याचबरोबर केळी, डाळिंब, चिकू यांचेही मोठे नुकसान झाले आहे़ जोराचा वारा अन् गारांचा मारा झाल्याने आंबे झडले आहेत़ परिणामी अवकाळीमुळे आमराईवर अवकळा आली आहे़

अवकाळीमुळे आमराईवर आली अवकाळा ज्वारी काळी ठिक्कर : फळबागेचेही मोठे नुकसान
श रूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, दैठणा, येरोळ, उजेड, बिबराळ, बाकली आदी सर्वच गावावर रविवारी सलग तिसर्यांदा गारपीट अन् वादळी पावसाची हॅटट्रीक झाली असून, या वादळी पावसाने ज्वारी काळी ठिक्कर पडली आहे़ त्याचबरोबर केळी, डाळिंब, चिकू यांचेही मोठे नुकसान झाले आहे़ जोराचा वारा अन् गारांचा मारा झाल्याने आंबे झडले आहेत़ परिणामी अवकाळीमुळे आमराईवर अवकळा आली आहे़शिरूर अनंतपाळ तालुक्यात सिंचनाच्या सुविधा असल्याने शेतकरी फळबागेकडे वळले असून, सर्वाधिक आंब्याची लागवड झाली आहे़ ५० ते ६० हेक्टर्समध्ये आमराई बहरली आहे़ आंबे महागल्याने शेतकर्यांच्या पदरात चांगलेच उत्पादन पडेल, अशी अपेक्षा असतानाच तालुक्यात गेली तीन-चार दिवसापासून अवकाळीने जोर धरला असून, रात्रीच्या वेळी वादळी वारा अन् गारांचा मारा असा प्रकार सुरु झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे़ झाडावर लगडलेली आंबे झडल्याने आमराईत कच्या आंब्यांचा सडा पडला आहे़ त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ तालुक्यात साठ हेक्टर्स फळबाग असली तरी यापैकी केवळ ५० हेक्टर्समध्ये आंब्याची लागवड झाली आहे़ सध्या आमराई चांगलीच बहरली आहे़ परंतू, आमराईवर अवकळा पसरल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे़ज्वारी काळी़़़तालुक्यात साडेअकराशे हेक्टर्स रबीचे क्षेत्र असले तरी जवळपास आठशे हेक्टर्समध्ये पेरणी झाली होती़ यात मोठ्या प्रमाणात असलेली रबी ज्वारी पावसाने काळी ठिक्कर पडली आहे़ तालुक्यात ३५ ते ४० हेक्टर्सवर आंब्याचे नुकसान झाले आहे़ तहसीलदारांच्या आदेशानुसार पंचनामे करण्यात येतील, असे तालुका कृषी अधिकारी डी़बी़सुतार यांनी सांगितले़