शिबिरामुळे शिक्षकांची दोन हजार प्रलंबित प्रकरणे मार्गी

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:35+5:302015-02-14T23:50:35+5:30

पुणे: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रकरणासाठी घेण्यात आलेल्या तालुकानिहाय शिबिरात सुमारे दोन हजार प्रकरणे मार्गी लावण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले.

Due to the camp, there are two thousand cases pending for teachers | शिबिरामुळे शिक्षकांची दोन हजार प्रलंबित प्रकरणे मार्गी

शिबिरामुळे शिक्षकांची दोन हजार प्रलंबित प्रकरणे मार्गी

णे: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रकरणासाठी घेण्यात आलेल्या तालुकानिहाय शिबिरात सुमारे दोन हजार प्रकरणे मार्गी लावण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले.
याबाबत वांजळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात तब्बल तीन हजारापेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या जिल्हा परिषदेकडे प्रलंबित होते. यामध्ये वैद्यकीय बिल, वरिष्ठ वेतन श्रेणी, स्थायीत्वाचा लाभ, वय वर्ष ५५ पूर्ण झालेल्या शिक्षकांचे पुनवार्ेलोकन वेतन आदी अनेक प्रश्न अपूर्ण प्रस्तावांमुळे जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षाकांच्या अडीअडचणी सोडविणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषदेत अनेक हेलपाटे मारल्यानंतर देखील वैद्यकीय बिल निघत नाही. यामुळे आता प्रत्येक तालुक्याचे प्रलंबित प्रश्नांची यादी करुन संबंधित शिक्षकांना अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करण्याचे कळविण्यात आले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यासाठी जानेवारी महिन्यात स्वतंत्र शिबिर घेऊन प्रश्न, प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात आली. जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीची ७५६ प्रकरणे, स्थायीत्वाचा लाभाची दीड हजार आणि वैद्यकीय बिलाची ११४ प्रकरणे या शिबिरामुळे मार्गी लावण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Due to the camp, there are two thousand cases pending for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.