२२ कोटींच्या थकबाकीमुळे विष्णूपुरी अंधारात मनपाकडे सात वर्षापासून थकले सव्वा कोटी

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30

विष्णूपुरी प्रकल्पाकडे वीज वितरण कंपनीच्या असलेल्या २२ कोटींच्या थकबाकीमुळे गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प अंधारातच आहे़ समाधानकारक पाऊस होवून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास जनित्राचाच आधार घ्यावा लागणार आहे़ तर दुसरीकडे मनपाकडे तब्बल सात वर्षापासून पाटबंधारे विभागाचे सव्वा कोटी रुपये थकीत आहेत़

Due to the amount of Rs.22 crores, Vishnupuri has been languishing in the dark for seven years | २२ कोटींच्या थकबाकीमुळे विष्णूपुरी अंधारात मनपाकडे सात वर्षापासून थकले सव्वा कोटी

२२ कोटींच्या थकबाकीमुळे विष्णूपुरी अंधारात मनपाकडे सात वर्षापासून थकले सव्वा कोटी

ष्णूपुरी प्रकल्पाकडे वीज वितरण कंपनीच्या असलेल्या २२ कोटींच्या थकबाकीमुळे गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प अंधारातच आहे़ समाधानकारक पाऊस होवून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास जनित्राचाच आधार घ्यावा लागणार आहे़ तर दुसरीकडे मनपाकडे तब्बल सात वर्षापासून पाटबंधारे विभागाचे सव्वा कोटी रुपये थकीत आहेत़
विष्णूपुरी प्रकल्पाचे अद्यापही पूर्ण काम झाले नाही़ त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाही़ सिंचनाचे क्षेत्रही कमी असले तरी, नांदेड शहर व परिसराची तहान भागविण्यासाठी धरणावरच अवलंबून रहावे लागते़ गेल्या काही वर्षात सतत दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकर्‍यांकडून वसूलीला अडचण येत आहे़ तर दुसरीकडे शासनाकडूनही मदत मिळेनाशी झाली आहे़ त्यामुळे विभागाच्या अडचणीत वाढ झाली आहे़ त्यात गत वर्षभरापासून २२ कोटींच्या वीज बिल थकबाकीसाठी महावितरणने प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे़ त्यामुळे प्रकल्प अंधारातच असून रात्रीच्या वेळी येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांनाही जीव मुठीत घेवून काम करावे लागते़ मागील वर्षी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यानंतर जनित्र लावून दरवाजे उघडण्यात आले होते़ परंतु एकाचवेळी अनेक दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास मोठी पंचाईत होणार आहे़ जुन्या बिलावर वाढत जाणारी रक्कम मोठी असताना चालू वर्षीचे ६६ लाख रुपयांचे वीज बिल थकीत आहे़ यापूर्वी प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेल्या अनेक मंत्र्यांनी वीज बिल माफ करण्याच्या घोषणा केल्या होत्या़ परंतु अद्यापही त्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत़
चौकट- त्रिशताब्दी सोहळ्याच्या काळात नांदेडात देश-विदेशातील भाविक आले होते़ यावेळी पवित्र गोदावरीत नदीवर शाही स्नानही करण्यात येत होते़ त्यासाठी पाटबंधारे विभागाने मनपाच्या सुचनेनुसार, प्रकल्पातील पाणी सोडले होते़ या पाण्याचे १ कोटी २८ लाख रुपयांचे बिल मात्र अद्यापही थकीतच आहे़ पाटबंधारे विभागाने मनपाकडे वारंवार पाठपुरावा करुनही ते बिल मिळाले नाही़ त्यात मनपाने पाटबंधारेला पत्र पाठवून सदरील बिलासाठी नगरविकास मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली असून त्यांच्याकडून मंजूरी मिळाल्यानंतर ही रक्कम देण्यात येईल़ तसेच तोपर्यंत या बिलाच्या रकमेची मागणी करु नये असेही पत्रात नमूद आहे़ त्यामुळे नगरविकास मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतरच ही रक्कम मनपाला मिळणार आहे़ शहरवासियांकडे असलेल्या थकबाकीसाठी वारंवार सोयीसुविधांना कात्री लावणारी मनपानेच सात वर्षापासून थकबाकी दिलेली नाही़

Web Title: Due to the amount of Rs.22 crores, Vishnupuri has been languishing in the dark for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.