जगभरात कमी उत्पादनामुळे डाळी महाग - अरुण जेटली
By Admin | Updated: July 28, 2016 16:36 IST2016-07-28T16:35:26+5:302016-07-28T16:36:40+5:30
जगभरात डाळीचे उत्पादन कमी झाल्यामुळे भारतात डाळीचा तुटवडा असून, किंमती जास्त आहेत.

जगभरात कमी उत्पादनामुळे डाळी महाग - अरुण जेटली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - जगभरात डाळीचे उत्पादन कमी झाल्यामुळे भारतात डाळीचा तुटवडा असून, किंमती जास्त आहेत. डाळी संदर्भातील राहुल गांधींच्या वक्तव्याशी असहमत असून, डाळीच्या किंमती मागणी आणि पुरवठयावर ठरतात असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.
डाळीच्या वाढत्या किंमतींवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारला धारेवर धरले. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी या सरकारने अनेक पावले उचलली आहेत.
संपुआ सरकारच्या काळात धोरण लकवा होता. तुमचे सरकार गेले त्यावेळी महागाई दर दोन आकडी होता असे जेटली म्हणाले. मान्सूनपूर्वी किंमती वाढणे सामान्य बाब आहे असे जेटलींनी सांगितले.