शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज तस्कर, गँगस्टर रडारवर; ६ राज्यांत १५० ठिकाणी धाडी; दहशतवाद्यांशी संबंध, एनआयएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 06:32 IST

देशातील अनेक राज्यांतही त्यांचे नेटवर्क असल्याची माहितीही समोर आली होती. या प्रकरणात एनआयएने १९ जणांना अटक केली आहे.

भोपाळ : अमली पदार्थ तस्कर, दहशतवादी आणि गँगस्टर यांच्यातील संबंधांच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी सहा राज्यांतील सुमारे १५० पेक्षा अधिक ठिकाणांवर धाडी टाकल्या. याप्रकरणी एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली आहे. 

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत एनआयएने छापेमारी केली. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात धाडीनंतर जितेंदरसिंग नावाच्या एका व्यक्तीला पकडण्यात आले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा येथेही धाडी टाकण्यात आल्या. (वृत्तसंस्था) 

मोबाइल ताब्यात घेऊन घरी सोडले- मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी जितेंदरसिंग याच्या खात्यावरील पैशांसंबंधी त्याची चौकशी करण्यात आली. - फिलिपिन्समधील त्याचा भाऊ त्याच्या खात्यावर नियमित पैसे जमा करतो. एका व्यवहारात त्याने तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर घाईघाईने ५० हजार जमा केल्याचे आढळून आले आहे. त्याचा मोबाइल फोन ताब्यात घेऊन त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सेंधवामध्ये एनआयएच्या पथकाने शिकलकरी समाजाचे सदस्य राहत असलेल्या एका ठिकाणी छापा मारला. या लोकांवर बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचे उत्पादन आणि पुरवठ्याचा आरोप आहे. 

वर्षभरापूर्वीच लावला होता छडा - सूत्रांनी सांगितले की, याप्रकरणी एनआयएने गेल्या वर्षी गुन्हे नोंदवले होते. विदेशातील काही गुन्हेगारी टोळ्या उत्तर भारतात हत्या आणि हिंसाचार घडविण्यासाठी काम करीत असल्याच्या माहितीवरून हे गुन्हे नोंदविण्यात आले होते. - दहशतवादी, गँगस्टर आणि अमली पदार्थ तस्कर एकत्रितरीत्या काम करून दहशतवादी कारवायांसाठी शस्त्रास्त्र तस्करी करीत असल्याची माहितीही एनआयएला मिळाली होती. - देशातील अनेक राज्यांतही त्यांचे नेटवर्क असल्याची माहितीही समोर आली होती. या प्रकरणात एनआयएने १९ जणांना अटक केली आहे. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी